विद्यापीठ म्हणते उत्तरपत्रिका झाल्या गहाळ

By Admin | Updated: October 13, 2015 00:03 IST2015-10-12T23:57:46+5:302015-10-13T00:03:00+5:30

विधीच्या विद्यार्थ्यांवर टांगती तलवार : विद्यापीठाच्या सत्र परीक्षेवर बहिष्कार टाकण्याचा पवित्रा

University says it's missing the answer sheets | विद्यापीठ म्हणते उत्तरपत्रिका झाल्या गहाळ

विद्यापीठ म्हणते उत्तरपत्रिका झाल्या गहाळ

नाशिक : एप्रिल महिन्यात विद्यापीठाकडून घेण्यात आलेल्या वार्षिक परीक्षेमध्ये द्वितीय वर्षाच्या बारा विद्यार्थ्यांना ‘पुरावा’ विषयामध्ये अनुत्तीर्ण करण्यात आले; मात्र विद्यार्थ्यांनी याबाबत आक्षेप घेत विद्यापीठाच्या उत्तरपत्रिका तपासणीच्या पद्धतीबाबत संशय घेत उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतींची मागणी अर्जाद्वारे केली आहे. तीन महिने उलटले असून, अद्याप विद्यार्थ्यांच्या हातात छायाप्रत आलेली नसून विद्यापीठाच्या संबंधित विभागाने उत्तरपत्रिका गहाळ झाल्याचे सांगून हात वर केल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
शहरातील न. भ. ठाकूर विधी महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी बारा विद्यार्थी द्वितीय वर्षाच्या ‘पुरावा’ विषयामध्ये अनुत्तीर्ण झाले.

Web Title: University says it's missing the answer sheets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.