शहरात एकात्मता दौड

By Admin | Updated: October 31, 2015 23:51 IST2015-10-31T23:50:40+5:302015-10-31T23:51:17+5:30

राष्ट्रीय एकता दिन : शिस्तबद्ध संचलनाने नागरिकांचे वेधले लक्ष

Unity Races in the City | शहरात एकात्मता दौड

शहरात एकात्मता दौड

 नाशिक : देशाचे पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या केल्या जाणाऱ्या राष्ट्रीय एकता दिनानिमित्त पोलीस आयुक्तालयातर्फे शहरातील मुख्य रस्त्यांवरून शनिवारी (दि़३१) सायंकाळी रूट मार्च काढण्यात आला़ मोर्चाच्या अग्रभागी असलेल्या वाहनावर भारताच्या तिरंगासह बॅण्डपथकाची साथ व शिस्तबद्ध संचलन यामुळे या रुटमार्चने शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले होते़
पोलीस मुख्यालयातील मारुती मंदिराजवळून या रुटमार्चला सुरुवात झाली़ येथून के.टी़एच़एम़ कॉलेज, डोंगरे वसतिगृह, कॅनडा कॉर्नर, कुलकर्णी गार्डन, मनपा कार्यालयासमोरून टिळकवाडी सिग्नलकडून पुढे जात पोलीस कवायत मैदानावर जात या रुटमार्चचे समाप्ती झाली़ या रुटमार्चमध्ये नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील महिला व पुरुषांचे पथक, महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीचे दोन पथक, गृहरक्षक दल, अग्निशमन दल, नागरी संरक्षण दल तसेच शहर वाहतूक पोलिसांचे पथक सहभागी झाले होते़ याबरोबरच अग्निशमन दलातील वाहनाचाही समावेश होता़
पोलीस उपआयुक्त विजय पाटील, पंकज डहाणे, अविनाश बारगळ, श्रीकांत धिवरे, ग्रामीणचे अपर पोलीस अधीक्षक प्रशांत मोहिते, सहायक पोलीस आयुक्त अतुल झेंडे, सचिन गोरे, डॉ़ राजू भुजबळ, विजयकुमार चव्हाण, प्रशांत वाघुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा रुटमार्च काढण्यात आला़ यावेळी अपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत सोमवंशी, शंकर काळे, मनोज कारंजे, सुरेश सपकाळे आदिंसह पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते़

एकता दौडमध्ये मान्यवरांचा सहभाग
सरदार पटेल जयंतीनिमित्त सकाळी छत्रपती शिवाजी स्टेडियमपासून एकता दौड काढण्यात आली़ यामध्ये अपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, पोलीस उपायुक्त विजय पाटील, एऩ अंबिका, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर, आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत यांच्यासह शाळेचे विद्यार्थी व क्रीडाशिक्षक सहभागी झाले होते़ प्रारंभी सर्वांना शपथ देण्यात आली़

Web Title: Unity Races in the City

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.