एकोपा संपला; स्वतंत्र प्रचार सुरू

By Admin | Updated: January 31, 2017 00:33 IST2017-01-31T00:33:19+5:302017-01-31T00:33:32+5:30

बदलले रंग : प्रतिस्पर्ध्याला टाळण्याचा प्रकार

United; Free publicity | एकोपा संपला; स्वतंत्र प्रचार सुरू

एकोपा संपला; स्वतंत्र प्रचार सुरू

नाशिक : भाजपा आणि सेना या दोन्ही पक्षांकडे इच्छुकांची संख्या मोठी असल्याने या दोन्ही पक्षांनी आपल्या इच्छुकांना एकाच फलकावर प्रचार करण्याचे आणि एकत्रित प्रचाराला निघण्याचे फर्मान सोडले होते. त्यानुसार या निवडणुकीत एक नवा पायंडा पडल्याचे मानले जात होते. आता मात्र जसजशी तिकिटाची वेळ जवळ येऊ लागली आहे तसतसे हेच इच्छुक पक्षातील प्रतिस्पर्ध्याला टाळून व्यूहरचना आखू लागले आहेत. त्यामुळे काही दिवस एकत्र फिरणारे इच्छुक आता स्वतंत्र प्रचारयंत्रणेला लागले आहेत.  एकाच पक्षातील सर्वच इच्छुक एक दिलाने प्रचारात आणि प्रचार फलकावर दिसू लागल्याने प्रचाराच्या झगमगाटात मतदारांना काहीसा दिलासा मिळाला होता. प्रचार करताना कोणताही उमेदवार अथवा कार्यकर्त्याकडून कुरघोडी करण्याचा प्रकार समोर आलेला नव्हता. मतदारांपर्यंत पोहचताना एका ठिकाणी एक दुसऱ्या ठिकाणी दुसरा उमेदवार या पद्धतीने शिस्तबद्ध प्रचार सुरू होता, परंतु उद्धव ठाकरे यांनी मनपा निवडणुकीत युती करणार नसल्याची घोषणा केल्यानंत प्रभागातीलही चित्र बदलले आहे. भाजपा आणि सेना या दोन्ही पक्षांकडे तिकिटासाठीची फिल्डिंग लावण्यासाठी मोर्चेबांधणी केली जात आहे.  सेना-भाजपा युती तुटल्याने काही दिवसांपूर्वी एकदिलाने फिरणारे आणि विखुरलेले दिसतात. याचाच फायदा काही इच्छुक उमेदवार बरोबर घेत आहेत. कालपर्यंत इच्छुक उमेदवारांच्या कळपात फिरणारे उमेदवार आता मतदारांना एकटे गाठू लागले आहेत. उमेदवारांनी व्यक्तिगत प्रचाराची पत्रके वाटपास गती दिली आहे. सकाळी सकाळी महिला उमेदवार दारोदार फिरून मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करु लागले आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: United; Free publicity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.