शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
2
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
3
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
4
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
5
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
6
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
7
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
8
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
9
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
10
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
11
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
12
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
13
जॉन अब्राहमच्या 'फोर्स ३'मध्ये साउथच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीची झाली एन्ट्री, जाणून घ्या कोण आहे ती?
14
Dombivli Video: हात सोडला अन् ११व्या मजल्यावरून तरुण कोसळला; डोंबिवलीतील घटनेचा व्हिडीओ
15
दुहेरी हत्येच्या प्रयत्नाने दिल्ली हादरली, पतीने पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या 
16
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा
17
संविधान रक्षणासाठी काँग्रेस काढणार दीक्षाभूमी ते सेवाग्राम ‘संविधान सत्याग्रह पदयात्रा’
18
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला
19
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
20
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे

समाजातील सज्जनशक्तीचा अनोखा प्रत्यय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2021 00:33 IST

दीड वर्षांचा कोरोना काळ हा प्रत्येकाची कसोटी पाहणारा होता. त्याच्या कटुस्मृती पुसता न येणाऱ्या आहेत. तरीही त्यावर मात करीत दिवाळी सण उत्साहात साजरा झाला. माणुसकीचा प्रत्यय देणारे उपक्रम राबविले गेले. आदिवासी पाडे, झोपडपट्टीतील वंचित बांधवांपर्यंत फराळ, कपडे अशा माध्यमातून शहरी लोक पोहोचले. मूळ गावी जाऊन दिवाळी साजरी करत असताना श्रमदानातून बंधारे, कच्चे रस्ते बांधण्याचे उपक्रम काही गावांमध्ये हाती घेण्यात आले. माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत स्नेहमेळावा घेत असताना शाळेसाठी अर्थसाहाय्य केले. वस्तूरुपाने मदत केली.

ठळक मुद्देकोरोना काळातील दु:ख विसरून समाजातील वंचितांच्या मदतीसाठी पुढाकार

मिलिंद कुलकर्णीदीड वर्षांचा कोरोना काळ हा प्रत्येकाची कसोटी पाहणारा होता. त्याच्या कटुस्मृती पुसता न येणाऱ्या आहेत. तरीही त्यावर मात करीत दिवाळी सण उत्साहात साजरा झाला. माणुसकीचा प्रत्यय देणारे उपक्रम राबविले गेले. आदिवासी पाडे, झोपडपट्टीतील वंचित बांधवांपर्यंत फराळ, कपडे अशा माध्यमातून शहरी लोक पोहोचले. मूळ गावी जाऊन दिवाळी साजरी करत असताना श्रमदानातून बंधारे, कच्चे रस्ते बांधण्याचे उपक्रम काही गावांमध्ये हाती घेण्यात आले. माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत स्नेहमेळावा घेत असताना शाळेसाठी अर्थसाहाय्य केले. वस्तूरुपाने मदत केली. सज्जनशक्तीचा हा अनोखा प्रत्यय दिलासादायक आहे.न भूतो न भविष्यती असा कोरोना काळ सगळ्यांनी अनुभवला. त्यातून बाहेर पडायला काही काळ जाऊ द्यावा लागेल. भारतीय संस्कृतीतील सण-उत्सवाने लोकांमध्ये ऊर्जा निर्माण होते, त्याचा प्रत्यय दिवाळी सणामध्ये आला. दु:ख विसरून प्रत्येकाने आपल्या परिस्थितीनुसार सण साजरा केला. घरामधील जिवलग व्यक्ती या काळात हिरावली गेली, त्या दु:खाची छाया या उत्सवावर असली तरी इतरांच्या दु:खावर फुंकर घालण्याचा प्रयत्न झाला. ह्यइंडियाह्ण आणि ह्यभारतह्ण अशा चर्चा अधूनमधून झडतात आणि समाजातील दरी, विसंगतीवर बोट ठेवले जाते. पण या वादात न पडता वंचितांची दिवाळी गोड व्हावी, म्हणून प्रयत्न झाले. आदिवासी पाड्यांमध्ये जाऊन दिवाळी फराळ तसेच नवीन कपडे देण्यात आले. केवळ ह्यवाटपह्ण करणे अशी औपचारिकता नव्हती, तर त्यांच्यासोबत एक दिवस घालविण्यात आला. झोपडपट्टीतील वंचितांनाही अशी मदत करण्यात आली. त्यासाठी संस्था, संघटनांनी पूर्वतयारी, पूर्वनियोजन केले. प्रत्येकाला खारीचा वाटा उचलता यावा, यासाठी आवाहन केले. पाड्यात जाण्यासाठी कोणी इच्छुक असेल तर त्यांना सोबत घेण्यात आले. पारदर्शकता जपण्यात आली. कोठेही याची प्रसिध्दी नाही. चर्चा नाही. फलकबाजी नाही, भाषणबाजी नाही. ही सज्जनशक्ती समाजाचे बळ आहे. ती जपायला हवी.श्रमसंस्काराची जपणूककोरोना काळात माणसे घरात कोंडली गेली होती. दोन लाटा येऊन गेल्या, तिसऱ्या लाटेचा धोका असतानाही सर्व बंधने पाळून लोकांची मूळ गावाकडे पावले वळाली. नातेवाईक, शेजारीपाजारी, मित्रमंडळींच्या भेटी, सहवास हा ऊर्जा, उत्साह देणारा असतो. त्यामुळे दीड वर्ष भेटीगाठी झाल्या नसल्याने ओढ अधिक वाढली; पण गावात जाऊनही केवळ गप्पाटप्पा, आराम, पर्यटन, असे न करता लोकांनी गावाच्या गरजा ओळखून श्रमदान केले. कच्चे बंधारे बांधले, शेतवाटा तयार केल्या. गावातील, गल्लीतील लोकांनी एकत्र येऊन केलेले हे श्रमदान सकारात्मक पायंडा तयार करणारे ठरले. परगावी राहणाऱ्या लोकांना गावाची असलेली ओढ, आपल्या गावात सोयी-सुविधा व्हाव्यात यासाठी प्रत्यक्ष कृतीद्वारे त्यांनी उचललेले पाऊल खूप महत्त्वाचे आहे. असाच उत्साह माजी विद्यार्थ्यांमध्ये दिसून आला. दहावीच्या विद्यार्थ्यांनी समाजमाध्यमांचा प्रभावी वापर करीत गट तयार केले. स्नेहमेळावा गावात, शाळेत घेऊन जुन्या स्मृतींना उजाळा दिला. त्यासोबतच शाळेसाठी आवश्यक असलेल्या गोष्टींसाठी, पायाभूत सुविधांसाठी अर्थसाहाय्य, वस्तुरूपाने मदत केली. आणखी काय करता येईल, यासंबंधी विचारमंथन केले. आपल्या गावाविषयी, शाळेविषयी असलेली आस्था, जिव्हाळा यानिमित्ताने पुन्हा एकदा दिसून आला. या सकारात्मक गोष्टी पाहता ग्रामस्थांचीही जबाबदारी वाढली आहे. गावकीच्या राजकारणात गावाचा विकास कुठे रुतला आहे, हे सगळ्यांना ठाऊक आहे. त्याच्या पलीकडे जाऊन मूळ रहिवासी असलेल्या; परंतु वेगवेगळ्या शहरांत, देशात राहणाऱ्या नागरिकांच्या ज्ञानाचा, मदतीचा लाभ गावासाठी व्हावा, यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करायला हवेत. आठवड्यासाठी, एक दिवसासाठी गावात येणाऱ्या मूळ रहिवाशांनी केलेले श्रमदान, दातृत्व पाहता त्यांची या मातीशी जुळलेली नाळ, या मातीविषयी त्यांना असलेली ओढ दिसून आली. आपल्या गावाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी त्यांना योगदान देण्याची इच्छा आहे. फक्त राजकारण, श्रेयवाद यात पडण्याची त्यांची इच्छा नसते. पारदर्शकतेने कामे झाल्यास मदतीसाठी अनेक हात पुढे येऊ शकतात. कोरोनापश्चात या काळात हा विश्वास गावकऱ्यांना मिळाला, हे महत्त्वाचे आहे.

 

टॅग्स :SocialसामाजिकDiwaliदिवाळी 2021