नाशिक सायकलिस्टची अनोखी सलामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:20 IST2021-08-17T04:20:54+5:302021-08-17T04:20:54+5:30
नाशिक : देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनच्या वतीने शिवाजी स्टेडियम ग्राउंड येथे अमृत महोत्सवी वर्ष ...

नाशिक सायकलिस्टची अनोखी सलामी
नाशिक : देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनच्या वतीने शिवाजी स्टेडियम ग्राउंड येथे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करण्याच्या अनुषंगाने नाशिक सायकलिस्ट ग्रीन जर्सी परिधान करून ७५ आकड्यांचा अनोखा आकार साकारत तसेच तालासुरात राष्ट्रगान करीत राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली.
अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने सायकलिस्ट एका तालासुरात गाऊन व्हिडिओ केंद्र शासनाला पाठविण्यात आला व त्यासाठी सर्टिफिकेट पण प्राप्त झाले. . देशप्रेमासाठी सर्व सायकलिस्ट एकत्रित येऊन हा अनोखा उपक्रम पार पडला, असे मत अध्यक्ष राजेंद्र वानखेडे यांनी मांडले. या अभिनव उपक्रमासाठी मोलाचे सहकार्य जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांचे लाभले.
उपक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी उल्हास कुलकर्णी, जाकीर पठाण, पुष्पा सिंग, राजेश्वर सूर्यवंशी, खजिनदार रवींद्र दुसाने, सचिव डॉ. मनीषा रौंदळ यांनी परिश्रम घेतले.
फोटो
१६सायकलिस्ट
.