शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा मनपा शाळांचे  विलगीकरण अशक्यच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 01:20 IST

महापालिकेच्या ९० शाळांचे पुन्हा विलगीकरण करून १२७ शाळा करण्यास कायदेशीर अडचणी निर्माण झाल्या असून, त्यामुळे पूर्वीप्रमाणेच शाळांची रचना अशक्य असल्याचे वृत्त आहे.

नाशिक : महापालिकेच्या ९० शाळांचे पुन्हा विलगीकरण करून १२७ शाळा करण्यास कायदेशीर अडचणी निर्माण झाल्या असून, त्यामुळे पूर्वीप्रमाणेच शाळांची रचना अशक्य असल्याचे वृत्त आहे. शासनाच्या शिक्षण विभागाकडे यासंदर्भातील सर्व प्रकारची पूर्तता पूर्ण करण्यात आली असून, आता केवळ लोकप्रतिनिधींच्या मनात आले म्हणून त्यात बदल करणे शक्य नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.महापालिका शिक्षण मंडळाच्या १२७ शाळा होत्या. परंतु गेल्या वर्षी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शिक्षण मंडळाचे विभागात रूपांतर झाल्यानंतर कमी पटसंख्या असलेल्या शाळांचे विलिनीकरण करून घेतले. त्यामुळे १२७ शाळांच्या ९० शाळांमध्ये रूपांतर करण्यात आले आहे, परंतु यामुळे काही समस्या जाणवत असल्याचे शिक्षण समितीच्या सदस्यांचे म्हणणे आहे. विशेषत: काही शाळांमध्ये पटसंख्या वाढल्याने शिक्षक संख्येचे गणित बिघडले आहे. काही विषयांना शिक्षक नाही, तर काहींनी अतिरिक्तशिक्षक उपलब्ध झाले आहेत, तर काही शाळांमध्ये वेळेची समस्या निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर शिक्षण समितीच्या बैठकीत जोरदार चर्चा झाली आणि शाळांचे विलगीकरण करण्याची मागणी करण्यात आली. प्रशासनाधिकारी उदय देवरे यांनी त्यासंदर्भात प्रयत्न करू, असे सांगितले असले तरी प्रत्यक्षात मात्र हे कायदेशीरदृष्ट्या व्यवहार्य नसल्याचे वृत्त आहे.शिक्षण विभागाने फार मोठा धोरणात्मक निर्णय घेताना शिक्षणखात्याकडील आयडी आणि अन्य सर्व कोड नंबर बदलले आहेत, तर काही कोड नंबर रद्दच करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर आता पुन्हा त्याच पद्धतीच्या शाळा सुरू करणे अत्यंत अडचणीचे ठरणार असून, शिक्षण विभागाने नकार दिल्याचे वृत्त आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाSchoolशाळा