शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

मनपा कर्मचाऱ्यांच्या गणवेश भत्त्यात दुप्पट वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 01:08 IST

महापालिकेच्या विविध विभागात काम करणाºया आणि कामाच्या अनुषंगाने गणवेश असणाºया कर्मचाऱ्यांच्या गणवेश भत्त्यात वाढ करून त्यांना दुप्पट भत्ता देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने महासभेपुढे ठेवला आहे. येत्या १८ फेबु्रवारीस महासभा होणार असून, त्यात यासंदर्भात निर्णय घेतला जाणार आहे.

ठळक मुद्देप्रस्ताव : फायरमनला पाच हजार रुपये

नाशिक : महापालिकेच्या विविध विभागात काम करणाºया आणि कामाच्या अनुषंगाने गणवेश असणाºया कर्मचाऱ्यांच्या गणवेश भत्त्यात वाढ करून त्यांना दुप्पट भत्ता देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने महासभेपुढे ठेवला आहे. येत्या १८ फेबु्रवारीस महासभा होणार असून, त्यात यासंदर्भात निर्णय घेतला जाणार आहे.प्रशासनाने सादर केलेल्या प्रस्तावानुसार वैद्यकीय विभागात कार्यरत कर्मचाºयांच्या सध्याच्या गणवेश भत्त्यात वाढ करून दरमहा पन्नास रुपयांऐजी शंभर रुपये देण्यात येणार आहे. गणवेशासाठी वर्षाकाठी १२०० रुपये मिळणार आहेत. तर अग्निशमन विभागात कार्यरत कर्मचाºयांनादेखील शासनाच्या वनविभागाच्या धर्तीवर दरवर्षी गणवेश आणि सुरक्षा साहित्यासाठी अडीच हजाराऐवजी पाच हजार रुपये दिले जाणार आहेत. दरम्यान, अग्निशमन विभागात कार्यरत असलेल्या फायरमनलादेखील अल्प रक्कम यापूर्वी दिली जात होती. त्यातही दुपटीने वाढ करण्यात येणार आहे. गणवेश कापड, रेनकोट, गमबूट, मोजे तसेच गणवेश शिलाईसाठी आता एकरकमी पाच हजार रुपये वर्षाला दिले जाणार आहेत.वैद्यकीय विभागवैद्यकीय विभागातील हेड नर्स, स्टाफ नर्स, एएनएम, जीएनएम, असिस्टंट मेट्रन या संवर्गातील कर्मचाºयांना गणवेशासाठी पूरक कापड, साड्या आणि इतर साहित्यासाठी वेतनातच दरमहा ५० रु पये अदा केले जाते. सदरची रक्कम देण्याचा निर्णय २००६ पूर्वीचा आहे. त्याचप्रमाणे अनेक वर्षांत वैद्यकीय विभागातील कर्मचाºयांच्या भत्त्यात वाढ झालेली नव्हती. त्यामुळे त्यांच्या गणवेश भत्त्यात दुपटीने वाढ केली जाणार असून, त्याचा तीनशे कर्मचाºयांना लाभ होणार आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाEmployeeकर्मचारीMONEYपैसा