शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

युनीफाइड डीसीपीआरवर  उद्या होणार सुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 01:23 IST

संपूर्ण राज्यात समान बांधकाम नियमावली (युनीफाइड डीसीपीआर) करण्याच्या नावाखाली नाशिककरांना अन्याय करण्याच्या प्रस्तावावर नाशिकमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली असून, आत्तापर्यंत सुमारे चारशे तक्रारी दाखल करण्यात आल्याचे वृत्त आहे.

नाशिक : संपूर्ण राज्यात समान बांधकाम नियमावली (युनीफाइड डीसीपीआर) करण्याच्या नावाखाली नाशिककरांना अन्याय करण्याच्या प्रस्तावावर नाशिकमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली असून, आत्तापर्यंत सुमारे चारशे तक्रारी दाखल करण्यात आल्याचे वृत्त आहे. त्यावर येत्या २३ एप्रिल रोजी नाशिकरोड येथील नगररचना उपसंचालकांकडे सुनावणी होणार आहे.राज्यात वेगवेगळ्या शहरांसाठी वेगवेगळे बांधकाम नियम आहेत. तथापि, ते संपूर्ण राज्यासाठी एकसारखे असावेत, यासाठी केंद्र शासनाचा आग्रह असून त्यासंदर्भात राज्य शासनाकडे दीड ते दोन वर्षांपासून केंद्राने तगादा लावला होता. त्यानंतर केंद्र शासनाने ३१ मार्च ही डेडलाइन दिल्यानंतर राज्य शासनाने घाईघाईने गेल्या डिसेंबर महिन्यात अधिकाऱ्यांची समिती नियुक्त केली आणि त्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आदर्श आचारसंहिता लागू होण्याच्या आत म्हणजेच ८ मार्च रोजी समान बांधकाम नियमावलीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली, त्यावर हरकतींसाठी महिनाभराची मुदत देण्यात आली होती.या अधिसूचनेत नाशिक शहर अनेक सवलतींच्या ठिकाणी अपवाद करण्यात आल्याने तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. विशेषत: अन्य शहरांपेक्षा कमी चटई क्षेत्र देण्याबरोबरच पार्किंग आणि अ‍ॅमेनिटीज स्पेसबाबत वेगळे नियम असल्याने बांधकाम व्यावसायिकांनी तसेच ग्राहक संघटनांनी संताप व्यक्त केला आहे. चटई क्षेत्र घटविण्याच्या मुद्द्यावर क्रेडाईने तत्काळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे घातल्यानंतर त्यांनी सारवासारव केली आणि प्रिंटिंग मिस्टीक असल्याचे सांगून शुद्धीपत्रक काढले आणि नाशिकला अन्य शहरातच समाविष्ट केले. तथापि, हे सर्व प्रारूप मसुद्यात असून, प्रत्यक्षात काय निर्णय होतो हा भाग वेगळा असणार आहे. राज्य शासनाने दिलेल्या मुदतीत नाशिकमधून सुमारे चारशे हरकती घेण्यात आल्या आहेत़

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNashikनाशिक