शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

तरुणांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2021 20:39 IST

पिंपळगाव बसवंत : सप्तश्रृंगी गडावरील गणपती मंदिराजवळील तलावात हातपाय धुण्यासाठी गेलेल्या १८ वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना कोजागरीच्या पूर्वसंध्येला घडली. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो बुडाला असल्याचा अंदाज वर्तविला जात असून याबाबत कळवण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

ठळक मुद्देसप्तशृंगी गडावर कोजागरीनिमित्त गेला असताना दुर्घटना

पिंपळगाव बसवंत : सप्तश्रृंगी गडावरील गणपती मंदिराजवळील तलावात हातपाय धुण्यासाठी गेलेल्या १८ वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना कोजागरीच्या पूर्वसंध्येला घडली. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो बुडाला असल्याचा अंदाज वर्तविला जात असून याबाबत कळवण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.नीलेश प्रभाकर पवार (१८) असे युवकाचे नाव असून कोजागरीनिमित्ताने पिंपळगाव ते सप्तशृंगी गडावर पायी देवीच्या दर्शनाला मित्रांसोबत नीलेश गेला होता. याबाबत अधिक माहिती अशी की, पिंपळगाव बसवंत परिसरातील अंबिकानगर येथे राहणारा नीलेश प्रभाकर पवार हा कोजागरी पौर्णिमेनिमित्त मी देवीच्या दर्शनाला पायी मित्रांसोबत चाललो, असे आईला सांगून गेला. सोमवारी (दि.१८) रात्री गेला. रात्रभर देवीच्या नावाचा जागर करत नीलेश व मित्र परिवार गडावर पोहोचले.मात्र, देवीचे दर्शन घ्यायचे म्हणून हात-पाय धुण्यासाठी गणपती मंदिराजवळ असलेल्या तळ्याच्या कडेला गेला असता तो पाण्यात पडला आणि त्यातच बुडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रसंगी कळवण येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यानंतर त्याच्या गावी पिंपळगाव बसवंत येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.नीलेशच्या पश्चात आई, वडील, दोन बहिणी, भाऊ असा परिवार आहे. याबाबत अधिक तपास कळवण पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत.

टॅग्स :PoliceपोलिसDeathमृत्यू