वीजप्रवाह सुरू झाल्याने कर्मचाºयाचा दुर्दैवी मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 12:55 AM2017-08-18T00:55:47+5:302017-08-18T00:55:53+5:30

इंदिरानगर : शहरातील इंदिरानगर भागातील मोदकेश्वर चौकात बिघाड दुरुस्तीसाठी विद्युत खांबावर चढलेला महावितरणचा कर्मचारी शॉक लागून जागीच गतप्राण झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (दि.१७) घडली. या घटनेने संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

Unfortunate death of the employee due to the start of the electricity stream | वीजप्रवाह सुरू झाल्याने कर्मचाºयाचा दुर्दैवी मृत्यू

वीजप्रवाह सुरू झाल्याने कर्मचाºयाचा दुर्दैवी मृत्यू

googlenewsNext


विजेचा शॉक लागून खांबावरच अत्यवस्थ झालेले समीर वाघ यांना खांबावरून खाली उतरविताना कर्मचारी.


इंदिरानगर : शहरातील इंदिरानगर भागातील मोदकेश्वर चौकात बिघाड दुरुस्तीसाठी विद्युत खांबावर चढलेला महावितरणचा कर्मचारी शॉक लागून जागीच गतप्राण झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (दि.१७) घडली. या घटनेने संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
देवदत्त सोसायटीच्या परिसरातील वीजपुरवठ्यात बिघाड झाल्याची तक्रार महावितरण कार्यालयास प्राप्त झाली होती. सदर तक्रारीचे निवारण करण्यासाठी कर्मचारी समीर वाघ (२६), हेमराज कडेकर (३५) हे दोघे सकाळी साडेदहाच्या सुमारास दाखल झाले. समीर वाघ हे बिघाड दुरुस्तीसाठी खांबावर चढले तेव्हा विजेचा प्रवाह बंद करण्यात आला होता. हेमराज कडेकर हे खांबाजवळ उभे होते. काही मिनिटे झाल्यानंतर अचानकपणे वीजपुरवठा सुरू झाल्याने खांबावर दुरुस्ती करत असलेले समीर वाघ यांना विजेचा धक्का बसला व ते जिवाच्या आकांताने ओरडले. सदर प्रकार लक्षात आल्यानंतर हेमराज कडेकर यांनी तत्काळ भ्रमणध्वनीवरून, ‘वीजप्रवाह का सुरू केला ? तातडीने बंद करा, काम सुरू असून ‘जनमित्र’ला शॉक लागला आहे, असे कळविले’ त्यावेळी तातडीने पुन्हा विद्युत पुरवठा बंद करण्यात आला आणि हेमराज यांनी शिडीवरून खांब गाठला. यावेळी त्यांनी खांबावर बसून समीर वाघ यांना वीजप्रवाह कसा सुरू झाला?वीज कर्मचाºयांनी त्या परिसरातील विद्युत पुरवठा बंद करून बिघाड दुरुस्तीचे काम हाती घेतल्यानंतर काही मिनिटांमध्ये वीजपुरवठा पुन्हा कसा सुरू झाला व कोणी सुरू केला? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. वीजपुरवठा बंद करूनच वाघ व कडेकर विद्युत खांबाजवळ आले होते. दरम्यान, वाघ खांबावर चढले आणि काही मिनिटांत पुन्हा वीजपुरवठा सुरू झाला आणि वाघ यांचा यामुळे मृृत्यू झाला. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Unfortunate death of the employee due to the start of the electricity stream

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.