राज्यात प्रभावी अन् जिल्हा परिषदेत दुर्दैवी भाजपाची अवस्था
By Admin | Updated: November 7, 2014 00:40 IST2014-11-07T00:40:08+5:302014-11-07T00:40:42+5:30
राज्यात प्रभावी अन् जिल्हा परिषदेत दुर्दैवी भाजपाची अवस्था

राज्यात प्रभावी अन् जिल्हा परिषदेत दुर्दैवी भाजपाची अवस्था
नाशिक : राज्यात मोदी लाटेवर स्वार होऊन मागील वेळेपेक्षा तब्बल तीनपट जादा आमदार निवडून आणून भाजपाने प्रभावी असल्याचे दाखवून दिले असले तरी नाशिक जिल्'ात मात्र ११ पैकी जेमतेम एकच आमदार निवडून आल्यामुळे तसेच जिल्हा परिषदेतही प्रभावी खाते न मिळाल्याने भाजपाची अवस्था जेमतेमच राहिल्याचे चित्र आहे. जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी निवडीत अवघे पाच सदस्यांचे पाठबळ पाठीशी असूनही भाजपाने एका विषय समिती सभापतिपदी वर्णी लावण्यात यश मिळविले होते. विधानसभा निवडणुकीत मात्र ग्रामीण भागातील ११ विधानसभा मतदारसंघांत मात्र चांदवड-देवळ्याचा अपवाद वगळता एकाही जागेवर भाजपाला विजय मिळविता आला नाही. त्यामुळेच ग्रामीण भागात अजूनही भाजपाला पक्षसंघटन बळकट करावी लागण्याची चिन्हे आहेत.