अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नुकसान
By Admin | Updated: March 15, 2015 01:25 IST2015-03-15T01:25:12+5:302015-03-15T01:25:34+5:30
अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नुकसान

अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नुकसान
नाशिक : शुक्रवारी मध्यरात्री व शनिवारी पहाटे झालेला अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शहरालगतच्या गावांमधील शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आडगाव, नांदूर, दसक-पंचक, मखमलाबाद व मातोरी यांसह अन्य गावांमध्ये रब्बीच्या गहू पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. मखमलाबाद गावालगत असलेल्या शेतीतील काढणीला आलेले कांदे, दाणे भरलेला गहू, साखर उतरलेले द्राक्ष या पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. द्राक्षाचे मणी गळून शेतात पडल्याचे चित्र होते. तयार झालेला गहू अक्षरश: आडवा झाल्याचे दिसून आले. वाफ्यावर आलेले काही फळपिकांचेही नुकसान झाले आहे. (प्रतिनिधी)