आपलं पॅनल’ला निर्विवाद बहुमत

By Admin | Updated: November 18, 2015 22:42 IST2015-11-18T22:41:45+5:302015-11-18T22:42:28+5:30

मनमाड : प्रगती अर्बन बॅँक निवडणूक; ‘नम्रता’चा धुव्वा‘

The undisputed majority of your panel | आपलं पॅनल’ला निर्विवाद बहुमत

आपलं पॅनल’ला निर्विवाद बहुमत

 मनमाड : शहराची अर्थवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रगती अर्बन बॅँकेच्या निवडणुकीत आपलं पॅनलने सर्व १५ जागा जिंकून निर्विवाद बहुमत प्राप्त केले.
प्रगती बॅँकेने गेल्या १९ वर्षात चौफेर आर्थिक प्रगती केली असून, पारदर्शक कारभारामुळे या बॅँकेचा नावलौकिक टिकून आहे. बॅँकेचे संस्थापक अध्यक्ष पन्नालाल शिंगी व सहकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली तयार करण्यात आलेले आपलं पॅनलच्या विरोधात दादा बंब, रवींद्र घोडेस्वार यांच्या नेतृत्वाखालील नम्रता पॅनलने लढत दिली. छत्रे विद्यलयात झालेल्या या निवडणुकीची हिरूभाऊ गवळी मंगल कार्यालयात कडक पोलीस बंदोबस्तात मतमोजणी करण्यात आली. या चुरशीच्या निवडणुकीत आपलं पॅनलचे सर्वच्या सर्व १५ उमेदवार विजयी झाले. यात सर्वसाधारण गटातून पन्नालाल शिंगी (२०२०), कल्याणचंद ललवाणी (१९८१), हिरालाल सुराणा (१९३७), अशोक शिंगी (१८८५), संदीप ललवाणी (१८५०), मनोज बाफना (१८४७), संदीप कुलकर्णी (१८४१), सुनील भंडारी (१७९१), सुभाष संकलेचा (१७८७), विनोद दातार (१६८८), महिला राखीव गटात पुष्पा राका (१९७९), पुष्पा लोढा (१८८९), अनुसूचित जाती-जमाती गटात दत्तात्रय हादगे (१८६४), इतर मागास प्रवर्ग गटात पंढरीनाथ वरखेडे (२०३२), विमुक्त जाती गटात मनोज गवळी (२१४१) हे उमेदवार विजयी झाले. निकाल जाहीर होताच कार्यकर्त्यांनी आतषबाजी करून जल्लोष केला. विजयी उमेदवारांची शहरातून ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. निवडणुकीत सभासदांनी विद्यमान संचालक मंडळावर विश्वास व्यक्त केल्याचे निकालातून स्पष्ट झाल्याचे पन्नालाल शिंगी यांनी तर आपले पॅनलच्या उमेदवारांच्या निस्वार्थी कारभारामुळे विजयश्री प्राप्त झाल्ल्याचे ज्येष्ठ उद्योजक अजित सुराणा यांनी सांगितले. (वार्ताहर)

Web Title: The undisputed majority of your panel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.