शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

वादग्रस्त पुलाला विनाचर्चा मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 00:07 IST

पूरस्थितीला कारणीभूत ठरणाऱ्या गोदावरी नदीवरील दोन नव्या पुलांवरून गेल्यावर्षी भाजपमध्ये वाद पेटला होता. मात्र, स्थायी समितीच्या मंगळवारी (दि.१९) झालेल्या बैठकीत यातील एका १८ कोटी रुपयांच्या पुलास विनाचर्चा मंजुरी देण्यात आली. ऐन कोरोना संकटाच्या काळातदेखील धावपळीत बोलाविण्यात आलेल्या बैठकीच्या पहिल्याच सुमारे पन्नास कोटी रुपयांच्या कामांना अशाच प्रकारे विकासाची कामे म्हणून विनाचर्चा मंजुरी देण्यात आली आहे.

ठळक मुद्देस्थायी समितीत निर्णय : ५० कोटींच्या कामांना मान्यता

नाशिक : पूरस्थितीला कारणीभूत ठरणाऱ्या गोदावरी नदीवरील दोन नव्या पुलांवरून गेल्यावर्षी भाजपमध्ये वाद पेटला होता. मात्र, स्थायी समितीच्या मंगळवारी (दि.१९) झालेल्या बैठकीत यातील एका १८ कोटी रुपयांच्या पुलास विनाचर्चा मंजुरी देण्यात आली. ऐन कोरोना संकटाच्या काळातदेखील धावपळीत बोलाविण्यात आलेल्या बैठकीच्या पहिल्याच सुमारे पन्नास कोटी रुपयांच्या कामांना अशाच प्रकारे विकासाची कामे म्हणून विनाचर्चा मंजुरी देण्यात आली आहे.मनपाच्या महासभेसाठी असलेल्या दालनात स्थायी समितीची सभा नूतन सभापती गणेश गिते यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी विविध विषयांना मान्यता देण्यात आली. परंतु सर्वाधिक महत्त्वाचा विषय गोदावरी नदीवरील पुलांचा होता. नदीच्या पुलापलीकडे निर्जन जागा असतानादेखील या ठिकाणी दोन पूल बांधण्यात येत असून, त्यासाठी भाजपच्या काही नगरसेवकांचा आग्रह होता. तर आमदार देवयानी फरांदे यांच्यासह काही नगरसेवकांनी विरोध केला होता. जलसंपदा विभागाची कोणतीही परवानगी न घेतला हा पूल बांधण्यात येत आहे. मुळात पूररेषेची तीव्रता कमी करण्यासाठी नदी प्रवाहाचे अडथळे हटविण्याची केंद्र शासनाच्या एका संस्थेने महापालिकेला शिफारस केली असताना दुसरीकडे मात्र पूल बांधण्याचा प्रस्ताव होता. तो महासभेत गेल्यावेळच्या महापौरांनी मंजूर केला होता. तर यंदा सभापती गणेश गिते यांच्या काळात तो मंजुरीसाठी स्थायी समितीवर सादर होता. त्यानुसार १७ कोटी ९४ लाख रुपयांच्या या प्रस्तावाला भाजपच्या किंवा अन्य कोणत्याही पक्षाच्या सदस्यांनी चर्चेला मान्यता दिली.दरम्यान, या पहिल्याच बैठकीत सुमारे पन्नास कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली. यात सातपूर विभागात सुला वाइन चौक ते दत्तमंदिर दरम्यान नासर्डी नदीवर पूल बांधणे, विविध ठिकाणी मलनिस्सारण देखभाल दुरुस्ती, पाइपलाइन टाकणे, गळती बंद करणे अशाप्रकारच्या कामांचा समावेश होता. बैठकीत सुप्रिया खोडे यांनी प्रभागातील गोठ्यांचा प्रश्न उपस्थित केल्यानंतर सभापतींनी ते शहराबाहेर हटविण्याचे आदेश दिले तर कल्पना पांडे यांनी प्रभागात पावसाळी पाण्याच्या निचºयासाठी दिलेले काम वर्षभरापासून होऊ शकले नाही, याबाबत तक्रार केली.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNashikनाशिक