जादा दराने विक्री करणाऱ्या दुकानदारांना नोटीसीद्वारे समज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2020 02:43 PM2020-03-31T14:43:39+5:302020-03-31T14:44:36+5:30

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील धामणगांव परिसरात जीवनावश्यक वस्तु भाजीपाला व अन्य सेवांची जादा दराने विक्र ी होत असुन नागरिकांचीआर्थिक लूट होत असल्याचे निदर्शनास आल्याने धामणगांव ग्रामपंचायत व महसूल विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने गांवातील भाजीविक्र ेते किराणा दुकानदार यांना नोटिसा देऊन समज देण्यात आली.

 Understanding notices to shopkeepers selling at higher rates | जादा दराने विक्री करणाऱ्या दुकानदारांना नोटीसीद्वारे समज

जादा दराने विक्री करणाऱ्या दुकानदारांना नोटीसीद्वारे समज

googlenewsNext

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील धामणगांव परिसरात जीवनावश्यक वस्तु भाजीपाला व अन्य सेवांची जादा दराने विक्र ी होत असुन नागरिकांचीआर्थिक लूट होत असल्याचे निदर्शनास आल्याने धामणगांव ग्रामपंचायत व महसूल विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने गांवातील भाजीविक्र ेते किराणा दुकानदार यांना नोटिसा देऊन समज देण्यात आली. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने संपूर्ण देशात लॉकडाऊन केल्यामुळे नागरिकांनी घराच्या बाहेर पडू नये, आपल्या गांवात पुणे, मुंबई तसेच इतर ठिकाणाहून कोणीही पाहुणे आले असल्यास त्विरत ग्रामपंचायत ,तलाठी तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधण्याचे आवाहन सरपंच ज्ञानेश्वर कोंडुळे, उपसरपंच शिवाजी गाढवे, तलाठी श्री.सय्यद, सर्कल श्री.आवारी यांनी केले आहे .तसेच संपूर्ण गावात ग्रामपंचायतीच्या वतीने निर्जंतुक औषधाची फवारणी करण्यात आली असल्याची माहिती ग्रामसेवक श्री.दळवी यांनी दिली. आज संपूर्ण देश कोरोना रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संघर्ष करत आहे. त्यामुळे देश संकटात असून कोणीही जीवनावश्यक वस्तूंची अवाजवी भावाने विक्र ी करू करू नये व गोरगरिबांची लूट होणार नाही याची दक्षता सर्वांनी घ्यावी. जे दुकानदार मालाच्या किमतीपेक्षा ग्राहकाकडून जास्त रक्कम घेतल्याचे निदर्शनास आल्यास त्या संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील अशा सूचना ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात आल्या आहेत. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य भरत भुमरे, भाऊसाहेब गाढवे, सिताराम मनोहर, ज्ञानेश्वर कोंडुळे, भरत गाढवे आदींसह सोशल डिस्टिन्संगची अंमलबजावणी करत जनजागृतीसाठी उपस्थित होते.

Web Title:  Understanding notices to shopkeepers selling at higher rates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक