भुयारी गटारीचे काम संथ गतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:11 IST2021-06-01T04:11:06+5:302021-06-01T04:11:06+5:30

सोयगाव : येथील डीके चौक परिसरात सध्या धीम्या गतीने चालू असलेल्या भुयारी गटारीच्या कामामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. ...

Underground sewer work at a slow pace | भुयारी गटारीचे काम संथ गतीने

भुयारी गटारीचे काम संथ गतीने

सोयगाव : येथील डीके चौक परिसरात सध्या धीम्या गतीने चालू असलेल्या भुयारी गटारीच्या कामामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. सूर्यवंशी लॉन्स, डीके चौक ते सोयगाव असे भूमिगत गटारीचे काम मागील तीन सप्ताहापासून अतिशय संथ गतीने चालू आहे. रस्ता खोदल्यानंतर मोठे पाईप त्यात टाकले जात असून, त्यातील मुरूम तसाच रस्त्यावर पडून आहे. पाऊस पडल्यास रस्त्यावर चिखल होतो. यामुळे दुचाकी घसरून अपघात होण्याची शक्यता आहे. तसेच रस्त्यावरील मुरूमाच्या ढिगाऱ्यामुळे रहदारीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. आधीच रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. संबंधितांनी पावसाळा सुरू होण्याच्या आत भुयारी गटारीचे काम जलद करावे. रस्त्यावर आलेला मुरूम - माती रोडरोलरने व्यवस्थित दाबून घ्यावी. प्रशासनाने डीके चौक परिसराचा विकास करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Web Title: Underground sewer work at a slow pace