समुपदेशनात ८७८ शिक्षकांना पदवीधरची लॉटरी

By Admin | Updated: July 5, 2014 00:17 IST2014-07-04T23:37:11+5:302014-07-05T00:17:18+5:30

समुपदेशनात ८७८ शिक्षकांना पदवीधरची लॉटरी

Undergraduate 878 teachers graduate lottery | समुपदेशनात ८७८ शिक्षकांना पदवीधरची लॉटरी

समुपदेशनात ८७८ शिक्षकांना पदवीधरची लॉटरी

नाशिक : शिक्षण बालहक्क कायद्यानुसार पटसंख्येनुसार शिक्षकांची नियुक्ती करण्याची कार्यवाही जिल्हा परिषदेने सुरू केली असून, गेल्या तीन दिवसांत समुपदेशनाद्वारे ८७८ उपशिक्षकांना पदवीधर शिक्षक म्हणून नियुक्ती देण्यात आल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी दिली.
गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात जिल्हा परिषदेच्या वतीने प्राथमिक शिक्षकांच्या समुपदेशनाची कार्यवाही सुरू करण्यात आली होती. या तीन दिवसांत आवश्यक १५८८ शिक्षकांपैकी विविध भाषांचे मिळून १०२१ शिक्षक भरण्याची कार्यवाही करावयाची होती. त्यात भाषेचे ३१६ शिक्षक हवे होते. इच्छुकांमधून सर्वच्या सर्व ३०१ शिक्षक मिळाले. त्याचप्रमाणे समाजशास्त्र विषयाचे ४६४ शिक्षक हवे होते, ते समुपदेशनातून मिळाले. विज्ञान व गणित विषयाचे २१६ पदवीधर शिक्षकांची गरज असताना केवळ ९८ शिक्षकच उपलब्ध होऊ शकले.


त्यामुळे उर्वरित शिक्षक हे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची पदवी असलेले व बारावीनंतर विज्ञान विषय घेऊन उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांचीही निवड करण्यात येणार असल्याचे सुखदेव बनकर यांनी सांगितले. एकूण १०२१ उपशिक्षकांमधून ८७८ पदवीधर शिक्षक भरण्याची कार्यवाही पूर्ण करण्यात आली, तर १०८ शिक्षक मिळू शकले नाहीत. उर्वरित विज्ञान व गणित विषयाच्या शिक्षकांच्या जागाही आठ दिवसांत भरण्यात येतील, असे बनकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Undergraduate 878 teachers graduate lottery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.