अल्पवयीन विधीसंघर्षित बालके पोलिसांच्या ताब्यात
By Admin | Updated: February 6, 2016 23:11 IST2016-02-06T23:10:25+5:302016-02-06T23:11:06+5:30
अल्पवयीन विधीसंघर्षित बालके पोलिसांच्या ताब्यात

अल्पवयीन विधीसंघर्षित बालके पोलिसांच्या ताब्यात
पंचवटी : पेठरोड, तसेच हिरावाडी परिसरात दिवसा व रात्रीच्या सुमाराला घरफोडी केल्याच्या संशयावरून पंचवटी पोलिसांनी तब्बल आठ अल्पवयीन विधीसंघर्षित बालकांना ताब्यात घेतले असून, हे सर्वच संशयित फुलेनगर (अंबिकानगर) झोपडपट्टीतील रहिवासी आहेत.
पोलिसांनी या संशयितांकडून सोन्या-चांदीचे दागिने तसेच तांब्याचे हांडे, बेंटेक्स ज्वेलरी असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. काही दिवसांपूर्वी हिरावाडी तसेच पेठरोडच्या कर्णनगर परिसरात घरफोडी झाल्याची घटना घडली होती या घटनेनंतर संशयित पसार झाले होते. सदर संशयित हे अंबिकानगर झोपडपट्टीत राहणारे असल्याबाबत माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रकाश सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरात सापळा रचून तब्बल आठ विधीसंघर्षित बालकांना ताब्यात घेण्यात आले आहे. सदर संशयित हे परिसरातील नागरिकांच्या घराच्या खिडक्या उघड्या दिसल्यास खिडकीतून हात घालून कपडे चोरणे तसेच मोबाइल चोरी करणे यांसारखे कृत्य करीत असल्याची कबुली खुद्द संशयितांनी दिल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस उपनिरीक्षक दिनेश मुळे, पोलीस हवालदार श्रीराम सपकाळ, विजय गवांदे, सुरेश नरवडे, प्रवीण कोकाटे आदिंनी ही कारवाई केली आहे. (वार्ताहर)