शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
2
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
3
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
4
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
5
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
6
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
7
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
8
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
9
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
10
रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले
11
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
12
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
13
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
14
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
15
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
16
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
17
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
18
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
19
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
20
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे

येवल्यात ३०० अतिक्र मणे हटविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 12:45 AM

येवला : शहरात बुधवारी सकाळी ७ वाजता नगरपालिकेच्या वतीने अतिक्रमण हटाओ मोहिमेत एकूण ७० कर्मचारी सहभागी होऊन सकाळच्या सत्रात ३०० अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली. अतिक्रमणे तातडीने काढून घ्या अन्यथा बुधवारपासून (दि. १६) पुन्हा मोहीम राबविणार हे पालिकेने जाहीर केले असल्याने बघ्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. 

ठळक मुद्देनागरिकांकडून उत्स्फूर्त स्वागत : पालिकेने दुसऱ्यांदा फिरवला हातोडा किरकोळ बाचाबाची

येवला : शहरात बुधवारी सकाळी ७ वाजता नगरपालिकेच्या वतीने अतिक्रमण हटाओ मोहिमेत एकूण ७० कर्मचारी सहभागी होऊन सकाळच्या सत्रात ३०० अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली. अतिक्रमणे तातडीने काढून घ्या अन्यथा बुधवारपासून (दि. १६) पुन्हा मोहीम राबविणार हे पालिकेने जाहीर केले असल्याने बघ्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. या मोहिमेसाठी कर्मचाºयांच्या दोन टीम करण्यात आल्या होत्या. एका टीमने सर्व साहित्यानिशी मोहीम हाताळण्याची जबाबदारी सांभाळली, तर दुसरी टीम प्रत्यक्ष अतिक्रमण काढण्यात सहभागी झाली होती. दोन जेसीबी, सहा ट्रॅक्टरसह ताफा येवला - विंचूर चौफुलीवर आला. मुख्याधिकारी संगीता नांदुरकरयांच्या नेतृत्वाखाली अतिक्रमण काढण्यास सुरुवात झाली. प्रथम सप्तशृंगी माता मंदिराजवळ असलेले अतिक्र मणावर पहिला दणका पडला. त्यानंतर थिएटर रोडकडे मोर्चा वळाला. जुनी नगरपालिका, न्हावी गल्ली, जनता विद्यालयासमोरील अतिक्र मणे काढण्यात आली. टिळक मैदानातील टपºया उचलण्याच्या सूचना दिल्याने त्यांनी तत्काळ त्या हलवल्या.सराफ बाजार बालाजी गल्ली, कापड बाजार, जब्रेश्वर खुंट, शिंपी गल्ली, खांबेकर खुंट, बजरंग मार्केट या परिसरातील रस्त्यात आलेल्या पायºया आणि ओटे जमीनदोस्त करण्यात आले.

मुख्याधिकाºयांकडे महिलांचे गाºहाणे

केवळ अतिक्र मणे काढू नका, आमच्या गटारी घाणीने भरल्या आहेत त्या साफ करा, अशी मागणी करत टिळक मैदानात सौ. सोनी यांनी पालिका मुख्याधिकारी संगीता नांदुरकर यांना सुनावले. हजरजबाबी मुख्याधिकारी यांनी या महिलेला याबाबत आपण कधी पालिकेला कळवले का, असा प्रतिप्रश्न केला. आम्ही आपल्या दारी आलोत म्हणून आपण तक्र ार सांगताय. आपण तक्र ार प्रत्यक्ष अथवा आॅनलाइन दाखल करा, त्यानंतर प्रश्न सुटेल.

अतिक्र मण मोहीम चालू असताना नगरसेवकांसह अन्य कोणाचीही अतिक्र मणे मोहिमेत सोडली जात असल्याचे काही नागरिकांनी सांगितले. त्यामुळे काही नागरिकांनी नाराजी व्यक्त करत थेट मुख्याधिकारी नांदुरकर यांच्याशी संपर्क साधून तक्रार केली. अतिक्र मण मोहिमेत ज्यांची अतिक्र मणे असतील ती सर्व काढली जातील, असे नांदुरकर यांनी सांगितले.

नांदुरकर यांच्या मोहिमेचे स्वागत

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्यावरील अतिक्र मणधारकांना एखाद्या तक्र ार अर्जावरून नोटिसा बजावण्यात येतात. अतिक्र मण मोहीम या रस्त्यापुरतीच मर्यादित असल्याने अतिक्र मणाच्या बाबतीत सार्वजनिक बांधकाम प्रशासन, बीओटीचे अधिकारी व पालिका प्रशासन केवळ कागदोपत्री कायदेशीर कार्यवाही करून केवळ कागदावर असणारे सर्वांग सुंदर येवला शहर कधी चांगले बनवणार, असा सवाल नागरिक करत असताना पालिकेने दुसºयांदा धाडसी स्वागतार्ह कारवाई केली आहे. बेकायदेशीरपणे कोणीही अतिक्र मणे करावीत आणि ज्यांची जबाबदारी आहे त्यांनी डोळेझाक करावी, झालेल्या अतिक्र मणाबाबत त्रयस्त माणसाने तक्र ार करावी आणि त्यानंतर जबाबदार अधिकाºयांनी कारवाई करण्याचा फार्स करावा हे नित्याचे झाले होते. परंतु नांदुरकर यांनी धडक कृतीतून आपला परिचय दिल्याने त्यांचे कौतुक होत आहे.