काका, रस्ता दुरुस्त करा; आम्ही तुम्हाला चॉकलेट देऊ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:15 IST2021-09-26T04:15:47+5:302021-09-26T04:15:47+5:30
शहरातील डी. के. कॉर्नर, आयकर कॉलनी, जयरामनगर, विष्णूनगर, भाऊसाहेबनगर परिसरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. या परिसरातील विद्यार्थ्यांनी एकत्रित येत ...

काका, रस्ता दुरुस्त करा; आम्ही तुम्हाला चॉकलेट देऊ
शहरातील डी. के. कॉर्नर, आयकर कॉलनी, जयरामनगर, विष्णूनगर, भाऊसाहेबनगर परिसरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. या परिसरातील विद्यार्थ्यांनी एकत्रित येत मनपा आयुक्त गोसावी यांची भेट घेतली. आमच्या शाळेला व क्लासला जाणाऱ्या रस्त्यावर (रवींद्र मेडिकल ते सूर्यवंशी लॉन्स) मोठमोठे खड्डे पडले आहेत. रस्त्यांवर पाण्याचे डबके साचले आहेत. त्यामुळे सायकली पडून जातात. सायकली पंक्चर होतात. खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचत असल्यामुळे डास, मच्छरांची उत्पत्ती वाढली आहे. औषध फवारणीवाले काकाही येत नाहीत. आमच्या समस्या सोडवून द्या, आम्ही तुम्हाला चॉकलेट देऊ, असे या विद्यार्थ्यांनी आयुक्तांना सांगितले. आयुक्त गोसावी यांनी सर्वेश वाघ, भूमी रत्नपारखी, दिया ठाकरे, अनन्या निकम, रिया निकम, मल्हार ठाकरे आदी विद्यार्थ्यांशी संवाद साधत लवकरच रस्ता दुरुस्त करून देऊ, असे सांगितले.
फोटो फाईल नेम : २४ एमएसईपी ०२. जेपीजी
फोटो कॅप्शन : मालेगाव शहरातील डी. के. चौक ते सूर्यवंशी लॉन्स दरम्यान रस्ता दुरुस्त करावा या मागणीचे निवेदन मनपा आयुक्त भालचंद्र गोसावी यांना देताना सर्वेश वाघ, भूमी रत्नपारखी, दिया ठाकरे, अनन्या निकम, रिया निकम, मल्हार ठाकरे आदी विद्यार्थी.
240921\175024nsk_20_24092021_13.jpg
फोटो कॅप्शन बातमी सोबत दिले आहे.