कांद्याच्या बियाणांचा अनधिकृत साठा, अंमळनेरला गुदाम सील
By Admin | Updated: June 24, 2015 01:37 IST2015-06-24T01:36:38+5:302015-06-24T01:37:56+5:30
कांद्याच्या बियाणांचा अनधिकृत साठा, अंमळनेरला गुदाम सील

कांद्याच्या बियाणांचा अनधिकृत साठा, अंमळनेरला गुदाम सील
नाशिक : विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाच्या भरारी पथकाने जळगाव जिल्'ातील कृषी विके्रत्यांची अचानक तपासणी केली असता अंमळनेर येथे कांद्याच्या सुट्या बियाणांचा अनधिकृत साठा करून विक्री करणाऱ्या एका विक्रेत्याचे गुदाम सील करून अडीच लाख रुपयांचे बियाणे जप्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच चाळीसगाव, धरणगाव व अंमळनेर तालुक्यातील १४ कृषी बियाणे-खते विक्रेत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. त्यात मे. स्वामी अॅग्रो सेल, शांतीसागर अॅग्रो सेल, न्यू पंकज कृषी सेवा केंद्र, सोहम कृषी सेवा केंद्र, धरती धन कृषी सेवा केंद्र, विजय कृषी मंदिर, कवर कृषी केंद्र, भार्गेश सेवा कृषी सेवा केंद्र, अजित अॅग्रो एजन्सी, फुले कृषी सेवा केंद्र, विजय एजन्सी, कृष्णा कावेरी कृषी केंद्र, जाजू अॅग्रो सेल्स, गणेश कृषी केंद्र, माहू कृषी केंद्र आदि कृषी विक्रेत्यांचा त्यात समावेश आहे. अंमळनेर तालुक्यातील गडखांब येथे साई कृषी केंद्रात गुदामात साठा न ठेवता अन्यत्र बियाणांचा साठा ठेवल्याचे, तसेच रजिस्टरमध्ये नोेंद न ठेवताच कांद्याच्या सुट्या बियाणांची विक्री करीत असल्याने दुकानातील २ लाख ३४ हजारांच्या बियाणांचा साठा जमा करून विक्री बंद आदेश देण्यात आले. तसेच एकूण तपासणीत तीन खते उत्पादक कंपन्यांना विक्री बंद आदेश देण्यात आले. आठ बियाणे कंपन्यांचे १४ नमुने घेऊन ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. ही कारवाई विभागीय कृषी सहसंचालक कैलास मोते यांच्या मार्गदर्शनाखाली गुणवत्ता नियंत्रण अधिकारी दीपेंद्रसिंह सिसोदिया, गुणवत्ता निरीक्षक तानाजी साठे, मोहीम अधिकारी प्रदीप ठाकरे, कृषी अधिकारी भालेराव व पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली. (प्रतिनिधी)