श्रीरामनगरमध्ये अनधिकृत लघुउद्योग; नागरिक त्रस्त
By Admin | Updated: November 16, 2015 21:40 IST2015-11-16T21:39:18+5:302015-11-16T21:40:01+5:30
श्रीरामनगरमध्ये अनधिकृत लघुउद्योग; नागरिक त्रस्त

श्रीरामनगरमध्ये अनधिकृत लघुउद्योग; नागरिक त्रस्त
इंदिरानगर : श्रीरामनगरमध्ये भरवस्तीत अनधिकृतपणे सुरू असलेल्या लघुउद्योगांमुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. महापालिका प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे.
श्रीरामनगरमध्ये बंगले, अपार्टमेंट व सोसायटी आहेत. यामध्ये शेकडोच्या संख्येने लोकवस्ती आहे. श्रीरामनगर लगत हरितपट्टा आहे. या ठिकाणीपूर्वी शेती करण्यात येत होती. सुमारे दोन वर्षांपूर्वी एकएक करून सुमारे ७ ते ८ लघुउद्योग कोणत्याही परवानगीविना थाटल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. लघुउद्योगाच्या कारखान्यांत दिवसा व रात्रीही कामे सुरू असल्याने त्यांचा काळा धूर निघतो. त्यामुळे वायुप्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. दुर्गंधीयुक्त निघणाऱ्या धुरामुळे परिसरातील रहिवाशांना घराची दारे-खिडक्या उघडणेसुद्धा मुश्किल झाले आहे. तसेच वाढत्या वायुप्रदूषणामुळे नाक, घसा आणि डोळ्यांच्या विकारात वाढ झाली आहे.
कोणतीही परवानगी नसताना परिसरातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या लघुउद्योगावर कोणतीही कारवाई होत नसल्याने नागरिकांत उलट-सुलट चर्चा सुरू आहे. (वार्ताहर)