अनधिकृत झोपडीधारकांनी स्वयंस्फूर्तीने अतिक्रमण काढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 00:26 IST2017-12-15T00:12:30+5:302017-12-15T00:26:00+5:30
वडाळागावातील पांढरी आई चौक ते मांगीरबाबा चौक या शंभर फुटी रस्त्यावरील रस्त्याच्या दुतर्फा व मधोमध असलेल्या अनधिकृत झोपड्या महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेच्या जेसीबीचा पंजा पडण्याच्या आताच काही अनधिकृत झोपडीधारकांनी स्वयंस्फूर्तीने झोपड्या काढण्यास सुरुवात केली आहे.

अनधिकृत झोपडीधारकांनी स्वयंस्फूर्तीने अतिक्रमण काढले
इंदिरानगर : वडाळागावातील पांढरी आई चौक ते मांगीरबाबा चौक या शंभर फुटी रस्त्यावरील रस्त्याच्या दुतर्फा व मधोमध असलेल्या अनधिकृत झोपड्या महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेच्या जेसीबीचा पंजा पडण्याच्या आताच काही अनधिकृत झोपडीधारकांनी स्वयंस्फूर्तीने झोपड्या काढण्यास सुरुवात केली आहे. परिसरातील सुमारे ३० ते ३५ अनिधकृत झोपडीधारकांनी संसारोपयोगी साहित्य काढून घेऊन पत्र्याचे शेड काढले आहे. शनिवार, दिनांक १६ रोजी परिसरात अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविली जाणार असल्याने जेसीबीचा पंजा पडण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी स्वत:चे अतिक्रमण काढून घेण्यास प्रारंभ केला आहे.
अतिक्रमणात होणारे नुकसान टाळण्यासाठी अनधिकृत झोपडी धारकांनी झोपड्या खाली करण्यासाठी धावपळ करताना दिसून येत आहे. अनधिकृत झोपड्यांमध्ये बहुतेक झोपडीधारकास घरकुल योजनेत घर मिळूनसुद्धा झोपड्या खाली करून रस्ता मोकळा न केल्याने त्यांच्यावर जेसीबीचा पंजा पडणार आहे.