विनाअनुदानित शाळांतील शिक्षकांची दिवाळी अंधारात
By Admin | Updated: October 24, 2015 22:38 IST2015-10-24T22:37:30+5:302015-10-24T22:38:19+5:30
विनाअनुदानित शाळांतील शिक्षकांची दिवाळी अंधारात

विनाअनुदानित शाळांतील शिक्षकांची दिवाळी अंधारात
दहिवड : राज्य शासनाकडून सर्व राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांना वेतनाच्या ६ टक्के महागाई भत्ता देण्याचे दिवाळीच्या पर्वावर जाहीर केले; मात्र दुसरीकडे गत १५ वर्षांपासून विनावेतन विद्यादानाचे कार्य करणाऱ्या विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांवर अनुदानअभावी आपली दिवाळी याहीवर्षी अंधारात साजरी करण्याची वेळ आली आहे.
२००१ पासून कायम विनाअनुदानित तत्त्वावर ह्या अनेक शाळा उघडण्यात आल्या. यातील ‘कायम’ हा शब्द २००९ मध्ये वगळण्यात येऊन ‘विनाअनुदानित’ नावाने आता ह्या शाळा सुरू आहेत. त्यानंतर २०११-१२ मध्ये या शाळांची मृय्यांकन प्रक्रिया पूर्ण झाली व वेळोवेळी शासनाने वेगवेगळ्या तारखेला साधारण १३४३ शाळा अनुदानास पात्र ठरविल्या; मात्र शासनाने कधी त्रयस्थ समिती, कधी आधारकार्ड सक्ती अशा अडचणी शाळांसमोर उभ्या केल्या. त्या पूर्ण करणेसाठी शाळांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. ह्यासर्व अटी शर्ती पूर्ण करुन देखील अशा शाळांना अनुदान निधी शासनस्तरावर मंजूर होऊ शकले नाही. परिणामी अशा शाळांमध्ये
काम करणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांच्या वतीने स्वत:चा विचार न करता
भावी पिढी घडविण्याचे काम
सदैव चालू आहे. मात्र त्यांच्या ह्या कार्याची दखल शासन घेत नाही. कायम विनाअनुदानित कृती समितीकडून आत्तापर्यंत अनेक आंदोलने झालीत; मात्र शासनस्तरावर काहीच तोडगा निघत नाही. या शिक्षकांच्या कुटुंबांना उपासमारीची वेळ आली आहे. अवघ्या काह दिवसांवर दिवाळीचा सण येऊन ठेपला असून राज्य शासनाकडून कर्मचाऱ्यांना ६ टक्के महागाई भत्ता देण्याची घोषणा केली. मात्र १५ वर्षापासून दारिद्र्याचे चटके सहन
करीत अध्ययन करणाऱ्या शिक्षकांच्या
व्यथा शासनाला दिसत नाही का,
असा सवाल विनाअनुदानित
शाळांतील शिक्षकांकडून केला जात आहे. (वार्ताहर)