अनधिकृत होर्डिंग्ज; ११ गुन्हे दाखल

By Admin | Updated: January 30, 2016 23:56 IST2016-01-30T23:56:12+5:302016-01-30T23:56:53+5:30

अनधिकृत होर्डिंग्ज; ११ गुन्हे दाखल

Unauthorized hoarding; 11 cases filed | अनधिकृत होर्डिंग्ज; ११ गुन्हे दाखल

अनधिकृत होर्डिंग्ज; ११ गुन्हे दाखल

नाशिक : उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने अनधिकृत होर्डिंग्ज, बॅनर्स याविरोधात महिनाभरात राबविलेल्या मोहिमेत १३९ अनधिकृत होर्डिंग्ज हटविण्याची कारवाई केली असून, ११ जणांवर पोलिसांत गुन्हे दाखल केले असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त जीवनकुमार सोनवणे यांनी दिली.
महापालिकेने न्यायालयाच्या निर्देशानुसार शहरात अनधिकृत होर्डिंग्जविरोधी कारवाई तीव्र व व्यापक केली होती. सहाही विभागीय कार्यालयांमार्फत सलगपणे मोहीम राबविण्यात आली असता दि. १ ते ३० जानेवारी या कालावधीत १३९ अनधिकृत होर्डिंग्ज हटविण्यात आले. याशिवाय विविध व्यावसायिकांनी रस्त्यालगत उभारलेले लोखंडी बोर्ड, स्टॅण्ड बोर्डही उखडून टाकण्यात आले. महिनाभरात २५०४ लोखंडी बोर्ड, स्टॅण्ड बोर्डवर कारवाई करण्यात आली, तसेच ३९६ कापडी बॅनर्सही हटविण्यात आले. सदर मोहिमेत ११ जणांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरात विनापरवाना होर्डिंग्ज उभारल्यास संबंधितांवर तत्काळ कारवाई केली जाणार असून सजग नागरिकांनीही कुठे अनधिकृत फलक आढळल्यास महापालिकेशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Unauthorized hoarding; 11 cases filed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.