बोगस आर्किटेक्टमुळे अनाधिकृत बांधकामे
By Admin | Updated: June 27, 2014 00:12 IST2014-06-26T21:14:54+5:302014-06-27T00:12:38+5:30
बोगस आर्किटेक्टमुळे अनाधिकृत बांधकामे

बोगस आर्किटेक्टमुळे अनाधिकृत बांधकामे
आर्किटेक्टसाठी काम करणाऱ्या ‘द इंडियन इन्स्टिट्यूट आर्किटेक्ट नाशिक’ या संस्थने शहरातील बोगस आर्किटेक्टची यादी तयार केली असून, लवकरच याबाबत या मंडळींची पोलखोल केली जाणार असल्याचे संस्थेने स्पष्ट केले आहे. संस्थेकडे सद्यस्थितीत ३५० आर्किटेक्टची अधिकृत नोंदणी करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त नोंदणी न केलेले १०० ते १५० आर्किटेक्ट शहरात कार्यरत असल्याचेही संस्थेने स्पष्ट केले. मात्र गेल्या काही काळात आर्किटेक्ट क्षेत्राशी काहीही संबंध नसलेली मंडळी स्वत:ला आर्किटेक्ट म्हणून मिरवत असल्याचे संस्थेच्या निर्दशनास आल्याने त्यांच्यावर लवकरच कारवाई केली जाणार असल्याचे संस्थेने स्पष्ट केले.
आर्किटेक्ट म्हणून कार्यरत असलेल्यांची कौन्सिल आॅफ आर्किटेक्चर यांच्याकडे नोंदणी केली जाते. ज्यांच्या आर्किटेक्ट या क्षेत्राशी संबंध नाही, त्यांच्यावर कौन्सिलला दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार आहेत.
... तर ४२० चा गुन्हा दाखल
कौन्सिल आॅफ आर्किटेक्चर यांना बोगस आर्किटेक्ट म्हणून काम करीत असलेल्या व्यक्तीची पुराव्यानिशी माहिती दिल्यानंतर त्यास याबाबतचे लेखी स्पष्टीकरण देण्याचे सांगितले जाते. त्यामध्ये दोषी आढळल्यास ५०० रुपयांपासून पुढे दंडात्मक कारवाई केली जाते. जर संबंधित व्यक्तीने लेखी स्पष्टीकरण देण्याचे नाकारल्यास त्यावर ४२० चा गुन्हा दाखल करण्याचे कौन्सिलला अधिकार आहेत. दरम्यान शहरात असलेल्या बोगस आर्किटेक्टची माहिती कौन्सिलला देण्यात येणार असल्याने बऱ्याच मंडळींवर अशाप्रकारची कारवाई होण्याची शक्यता आहे.
अधिकृत आर्किटेक्टची
यादी होणार जाहिर
द इंडियन इन्स्टिट्यूटकडे नोंदणी असलेल्या ३५० अधिकृत आर्किटेक्टची यादी संस्थेकडून जाहिर केली जाणार आहे. सध्या बोगस आर्किटेक्टकडून नाशिककरांची दिशाभूल करण्याचे काम केले जात असल्यानेच संस्थेने हा निर्णय घेतला आहे. यामुळे जनतेला नोंदणीकृत आर्किटेक्टकडून आपल्या इमारतीचे किंवा घराचे काम योग्यरितीने करणे सोयीचे होईल. शिवाय त्यांची कुठल्याही पद्धतीने फसवणुक होणार नसल्यानेच संस्थेने हा निर्णय घेतला असल्याचे स्पष्ट केले.