कॉलेजरोडवरील अनधिकृत बांधकाम हटविले
By Admin | Updated: November 21, 2015 00:10 IST2015-11-21T00:09:48+5:302015-11-21T00:10:08+5:30
कॉलेजरोडवरील अनधिकृत बांधकाम हटविले

कॉलेजरोडवरील अनधिकृत बांधकाम हटविले
नाशिक : महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने कॉलेजरोडवरील विनायका पार्क या इमारतीत टेरेसच्या जागेतील अनधिकृत बांधकाम शुक्रवारी हटविले.
महापालिकेच्या पश्चिम विभागाने सदर मोहीम राबविली. कॉलेजरोडवरील एचपीटी कॉलेजमागे असलेल्या विनायका पार्क या इमारतीत टेरेसच्या जागेत तसेच सामासिक अंतरात केलेल्या अनधिकृत बांधकामावर पथकाने हातोडा चालविला. सदर कारवाईप्रसंगी पश्चिमच्या विभागीय अधिकारी जयश्री सोनवणे, पूर्वच्या मालिनी शिरसाठ, सातपूर विभागाचे महेंद्र पगारे, सहायक अधीक्षक जी.जे. गवळी आदि उपस्थित होते.