अशोकनगरमधील अनधिकृत बांधकाम हटविले
By Admin | Updated: December 8, 2015 22:44 IST2015-12-08T22:42:28+5:302015-12-08T22:44:10+5:30
अशोकनगरमधील अनधिकृत बांधकाम हटविले

अशोकनगरमधील अनधिकृत बांधकाम हटविले
नाशिक : महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने अशोकनगर व समृद्धनगर येथील अनधिकृत बांधकामांवर मंगळवारी हातोडा चालविला. यावेळी सामासिक अंतरात उभारलेले पत्र्याचे शेड, पक्के बांधकाम हटविण्यात आले.
महापालिकेने अशोकनगर येथील संदीप पवार यांचे, तर समृद्धनगर, अमृतगार्डन येथील खैरनार यांनी उभारलेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली.
यावेळी जेसीबीच्या साहाय्याने शेड्स हटविण्यात आल्या. याप्रसंगी विभागीय अधिकाऱ्यांसह
कर्मचारी उपस्थित होते. पोलीस बंदोबस्तात सदर कारवाई करण्यात आली.