अनधिकृत फलकांविरोधी मोहीम
By Admin | Updated: March 19, 2017 00:31 IST2017-03-19T00:31:03+5:302017-03-19T00:31:14+5:30
नाशिक : महापालिका निवडणुकीनंतर शहरात ठिकठिकाणी उभ्या राहिलेल्या अनधिकृत फलकांविरुद्ध मोहीम राबविण्यात आली

अनधिकृत फलकांविरोधी मोहीम
नाशिक : महापालिका निवडणुकीनंतर शहरात ठिकठिकाणी उभ्या राहिलेल्या अनधिकृत फलकांविरुद्ध मोहीम राबविण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणावर फलक जमा करण्यात आले. विशेष म्हणजे सत्ताधारी भाजपाच्या नगरसेवकांना शुभेच्छा देणाऱ्या फलकांची संख्या अधिक होती.
महापालिका निवडणुकीतील निकालानंतर शहरात ठिकठिकाणी नवनिर्वाचित नगरसेवकांचे अभिनंदन करणारे तसेच शुभेच्छा देणारे फलक लावण्यात आले. जेथे जागा मिळेल त्याठिकाणी हे फलक उभारण्यात आले. त्याचबरोबर महापौर-उपमहापौर यांच्या अभिनंदनाचेही फलक विनापरवाना उभे राहिले. महापालिकेने या अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या फलकांविरोधी जोरदार मोहीम राबविली.
त्यात अनेक फलक जप्त करण्यात आले. दरम्यान, शासनानेही अनधिकृत फलकांविरोधी न्यायालयाच्या निर्देशानुसार काटेकोर कारवाई व्हावी यासाठी समिती स्थापन केली असून, या समितीला कारवाईसंबंधीचा त्रैमासिक अहवाल सादर करणे आयुक्तांना बंधनकारक केले आहे. (प्रतिनिधी)