मनपाची अनधिकृत बांधकामविरोधी मोहीम
By Admin | Updated: June 23, 2016 00:02 IST2016-06-22T23:52:23+5:302016-06-23T00:02:26+5:30
मनपाची अनधिकृत बांधकामविरोधी मोहीम

मनपाची अनधिकृत बांधकामविरोधी मोहीम
नाशिक : महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने बुधवारी सिडको आणि नाशिक पश्चिम विभागात अनधिकृत बांधकामे हटविण्याची मोहीम राबविली. अतिक्रमण विभागाकडे सप्टेंबर ते डिसेंबर २०१५ या कालावधीत प्राप्त तक्रारींचा निपटारा सध्या महापालिकेकडून सुरू आहे.
अतिक्रमणविरोधी पथकाने सिडकोतील सुवर्ण हौसिंग सोसायटीतील सुदाम नारायण वाणी यांच्या संरक्षक भिंतीच्या सुमारे ५० फुटाचे अनधिकृत बांधकाम हटविले. याचबरोबर पथक नाशिक गावठाण येथील गंगादर्शन अपार्टमेंट येथे पोहोचले त्यावेळी गोविंद हरी वैशंपायन यांनी आपले १५ बाय २० फुटाचे अनधिकृत बांधकाम स्वत:हून काढून घेतले.
सराफ बाजारातील ओकाची तालीमजवळ असलेल्या घर नंबर ६५५ मधील सारंगपाणी यांनी ओट्याचे केलेले अनधिकृत बांधकाम स्वत:हून काढून घेतले. सदर मोहीम सिडकोचे विभागीय अधिकारी आर. आर. गोसावी व पश्चिमचे विभागीय अधिकारी नितीन नेर यांच्या उपस्थितीत राबविण्यात आली. (प्रतिनिधी)