शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
4
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
5
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
6
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
7
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
8
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
9
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
10
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
11
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
12
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
13
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
14
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
15
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
16
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
17
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
18
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
19
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
20
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता

नाशिक बाजार समितीच्या सभापतिपदी सकाळे बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2020 8:01 PM

मागील वर्षापासून बाजार समितीत वर्चस्व असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार देवीदास पिंगळेंना राजकीय धक्का देत दोन संचालकांच्या बळावर शिवाजी चुंभळे यांनी सभापतिपद काबीज केल्याने बाजार समितीचे राजकारण तापून

ठळक मुद्देपंधरा संचालकांची एकजूट : चार महिने कामकाजाची संधी पिंगळे यांच्या विरोधात व चुंभळे यांच्याही विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक खात्यात गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या काही महिन्यांपासून रंगलेल्या राजकारणाचा समारोप बिनविरोध सभापती निवडीत झाला. बुधवारी घेण्यात आलेल्या निवडणुकीत संपतराव सकाळे यांची सभापतिपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

मागील वर्षापासून बाजार समितीत वर्चस्व असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार देवीदास पिंगळेंना राजकीय धक्का देत दोन संचालकांच्या बळावर शिवाजी चुंभळे यांनी सभापतिपद काबीज केल्याने बाजार समितीचे राजकारण तापून चुंबळे विरुद्ध पिंगळे असा सामना रंगला होता. त्यातून पिंगळे यांच्या विरोधात व चुंभळे यांच्याही विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक खात्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. एकमेकांवर कुरघोडीच्या राजकारणात चुंभळे यांच्या विरोधात काही दिवसांपूर्वी अविश्वास ठरावही मंजूर करण्यात येऊन त्यांना पायउतार करण्यात आले होते. त्यामुळे नवीन सभापती निवडीसाठी बुधवारी संचालकांची विशेष बैठक बोलाविण्यात आली. त्यात संपतराव सकाळेंचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बाजार समिती सभापतिपदी बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी काम पाहिले.संपतराव सकाळे यांच्या निवडीची घोषणा होताच, त्यांच्या समर्थकांनी बाजार समितीत जल्लोष साजरा केला. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीची मुदत येत्या आॅगस्ट महिन्यात संपुष्टात येत असून, नवीन सभापतींना अवघ्या चार महिन्यांचाच कालावधी मिळणार आहे.

टॅग्स :APMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीNashikनाशिक