शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

एस.टी.कडून पुन्हा अल्टिमेटम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 00:32 IST

नाशिक : शहर बससेवा चालविण्याची जबाबदारी महापालिकेची असल्याची भूमिका घेत राज्य परिवहन महामंडळाने महापालिकेला शहरातील बससेवा ताब्यात घेण्यासाठी मागील तीन वर्षांपासून पत्रव्यवहार सुरू केला आहे. मात्र पालिकेने प्रत्यक्षात पाऊल उचललेले नसल्याने राज्य परिवहन महामंडळाने आता पुन्हा पालिकेला अल्टिमेटम दिला असून, येत्या महिनाभरात शहरातील बससेवा ताब्यात घेण्यासाठी पत्र पाठवले आहे. महामंडळाच्या ...

नाशिक : शहर बससेवा चालविण्याची जबाबदारी महापालिकेची असल्याची भूमिका घेत राज्य परिवहन महामंडळाने महापालिकेला शहरातील बससेवा ताब्यात घेण्यासाठी मागील तीन वर्षांपासून पत्रव्यवहार सुरू केला आहे. मात्र पालिकेने प्रत्यक्षात पाऊल उचललेले नसल्याने राज्य परिवहन महामंडळाने आता पुन्हा पालिकेला अल्टिमेटम दिला असून, येत्या महिनाभरात शहरातील बससेवा ताब्यात घेण्यासाठी पत्र पाठवले आहे. महामंडळाच्या या पत्रावरून नवीन वर्षापासून एस.टी. महामंडळ शहर बससेवा थांबविण्याची शक्यता वर्तविली जात आहे.  शहर बससेवा चालविणे ही स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून महापालिकेची जबाबदारी असल्याने पालिकेने प्रवासी वाहतूक सेवा ताब्यात घ्यावी, यासाठी एस.टी. महामंडळाने वारंवार पत्रव्यवहार केला आहे. महामंडळाने अनेकदा निर्वाणीची भाषा वापरून कोणत्याही क्षणी शहर बससेवा बंद करण्याचीदेखील भूमिका घेतली होती. शहरातील जवळपास १३० बसफेºया बंददेखील करण्यात आलेल्या आहेत. मात्र अजूनही पालिकेकडून कोणतीही हालचाल होताना दिसत नाही. शहरानजीकच्या ग्रामीण भागातील बसेस बंद केल्यानंतर स्थानिक गावकरी आणि विद्यार्थ्यांनी बससेवा बंद करू नये, यासाठी महामंडळाला साकडे घातल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेता महामंडळाने तूर्तास सर्व बसेस बंद न करण्याची भूमिका घेत लांबपल्ल्याच्या गाड्यांना महामार्गावरील गावांचे थांबे देण्यात येऊन  तात्पुरता पर्याय काढण्यात आला आहे. सुरुवातीच्या विरोधानंतर महापालिकेने आता काही प्रमाणात अनुकूलता दर्शविली असून, यासंदर्भात एक समिती गठित करून खासगी संस्थांच्या माध्यमातून बससेवा चालविण्याच्या पर्यायाबाबत विचार केला जाईल, असे जाहीर केलेले आहे.  मात्र पालिकेची एकूणच मानसिकता आणि होणारा विलंब लक्षात घेता महामंडळाने पालिकेला त्वरित निर्णय घेण्यासंदर्भात पत्रव्यवहार केला आहे. महामंडळाला आता बस चालविणे शक्य नसल्याने आणि राज्यातील सर्व महापालिकांनी त्यांची बससेवा सुरू केल्यामुळे नाशिक महापालिकेने देखील दोन महिन्यांत याबाबत निर्णय घ्यावा, असे पालिकेला कळविले आहे. त्यामुळे आता येत्या काही दिवसांत शहरातील प्रवासी कोणत्या सार्वजनिक वाहनाने प्रवास करतील, याचा फैसला होणार आहे. विद्यार्थ्यांना दिलासा शहरापासून जवळच म्हणजे महापालिका हद्दीच्या सीमारेषांवरील गावांमधील बससेवा महामंडळाने बंद केली होती. सुमारे दीडशेपेक्षा जादा बसेस बंद करण्यात आल्या होत्या. त्यामुळे ग्रामीण भागातून शहरात येणाºया नागरिकांचे आणि विशेषत: विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ लागल्याने महामंहळाकडे तक्रारी वाढल्या होत्या. लोकप्रतिनिधींनीदेखील तूर्तास बसेस बंद न करण्याची मागणी केली होती. विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी महामंडळाने मुंगसरा, सिद्धपिंप्री, मखमलाबाद, सायखेडा, शिवडा, लाखलगाव, भगूर, गिरणारे येथील बंद केलेल्या बसेसच्या फेºया पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNashikनाशिक