मुक्त विद्यापीठाच्या ५७ अभ्यासक्रमांना यूजीसीचा ब्रेक

By Admin | Updated: July 14, 2016 00:51 IST2016-07-14T00:40:48+5:302016-07-14T00:51:26+5:30

कुलगुुरूंचे मौन : हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य वाऱ्यावर

UGC breaks for 57 courses of Open University | मुक्त विद्यापीठाच्या ५७ अभ्यासक्रमांना यूजीसीचा ब्रेक

मुक्त विद्यापीठाच्या ५७ अभ्यासक्रमांना यूजीसीचा ब्रेक

नाशिक : समाजातील प्रत्येक घटकाला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी विविध अभ्यासक्र्रम सुरू करणाऱ्या मुक्त विद्यापीठाच्या तब्बल ५७ अभ्यासक्रमांची यूजीसीने मान्यता रद्द केल्याने हजारो विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे. दरम्यान, याप्रकरणी कुलगुरूंनीच मौन साधल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात १३५ अभ्यासक्रम चालविले जातात. त्यातील निम्म्याहून अधिक अभ्यासक्रम हे कौशल्यावर आधारित आहेत. दुर्गम आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख शिक्षण देता यावे, या हेतूने विद्यापीठाने हे अभ्यासक्रम सुरू केले आहेत; मात्र यातील ५७ अभ्यासक्रमांची यूजीसीने मान्यता रद्द केल्याने अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या हजारो विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे रद्द केलेल्या अभ्यासक्रमांमध्ये कौशल्यावर आधारित अभ्यासक्रमांचाच अधिक समावेश असल्याने ‘रोजगाराभिमुख शिक्षण’ या संकल्पनेचे अस्तित्व धोक्यात आले आहे. अभियांत्रिकी, आर्किटेक्चर, डीएमएलटी, बीएससीआयडी, बी. ए. डिझायनिंग अशा कौशल्यावर आधारित अभ्यासक्रमांची मान्यता रद्द केली आहे. शिवाय या अभ्यासक्रमांचे प्रवेश शुल्कदेखील हजारो रुपये असल्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना आर्थिक फटकाही सहन करावा लागणार आहे.

Web Title: UGC breaks for 57 courses of Open University