शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

इगतपुरी रेल्वेस्थानकात दुर्गंधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 01:00 IST

मध्य रेल्वेच्या इगतपुरी स्थानकाच्या फलाट क्र. १च्या बाजूला असलेल्या कचराकुंडीमुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून, प्रवासी व येथे काम करणाऱ्या रेल्वे कर्मचारी व रहिवाशांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

इगतपुरी : मध्य रेल्वेच्या इगतपुरी स्थानकाच्या फलाट क्र. १च्या बाजूला असलेल्या कचराकुंडीमुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून, प्रवासी व येथे काम करणाऱ्या रेल्वे कर्मचारी व रहिवाशांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. पाऊस सुरू असल्याने या कचराकुंडीतील कचरा कुजत असून, सभोवताली दुर्गंधी पसरली आहे. सदरची कचराकुंडी घटविण्यात यावी, अशी मागणी होत आहे.या कचराकुंडीत पावसाचे पाणी साठत असल्यामुळे कचरा कुजत आहे. येथे माश्यांची झुंड दिसून येत असल्याने साथी रोगांना आमंत्रण मिळत आहे. रेल्वे स्थानकाच्या फलाट क्र. १ च्या बाजूलाच ही कचराकुंडी असल्याने स्थानकात गाडी थांबली तर प्रवाशांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. दररोज शेकडो मेल, एक्स्प्रेस प्रवास करतात. कसारा घाट सेक्शन असल्याने मुंबईकडे जाणाºया व नाशिककडे जाणाºया सर्व गाड्यांना येथे थांबा आहे. या दुर्गंधीयुक्त कचराकुंडीतील माश्या थेट अन्नपदार्थावर बसत असल्याने प्रवाशांसह रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. परिसरातील रहिवाशांनाही दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. येथील कचराकुंडी त्वरित हटविण्यात यावी, अशी मागणी रेल्वे प्रवाशी संघटनेसह नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :Nashikनाशिकrailwayरेल्वे