शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ महिलांचे मंगळसूत्र ओरबाडण्याचे प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 00:15 IST

येथील एका अपार्टमेंटच्या आवारात जाऊन एका वृद्धेला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने सुमारे ४५ हजार रु पये किमतीचे मंगळसूत्र बळजबरीने ओरबाडून नेल्याची घटना घडली आहे.

इंदिरानगर : येथील एका अपार्टमेंटच्या आवारात जाऊन एका वृद्धेला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने सुमारे ४५ हजार रु पये किमतीचे मंगळसूत्र बळजबरीने ओरबाडून नेल्याची घटना घडली आहे. इंदिरानगर भागात सातत्याने सोनसाखळी ओढून पोबारा करण्याच्या घटना घडत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नलिनी कुलकर्णी (७०, रा. चेतनानगर) या अपार्टमेंटच्या शेजारी असलेल्या किराणा दुकानात सामान घ्यायला सकाळच्या सुमारास आल्या. सामान घेऊन त्या पुन्हा घराकडे परतत असताना त्यांना एका दुचाकीस्वाराने हटकले. पत्ता विचारण्याच्या बहाण्याने त्याने संवाद साधण्याचा प्रयत्न करत असताना त्यांच्या गळ्यातील सुमारे दीड तोळे वजनाचे मंगळसूत्र ओरबाडून पळ काढला. सुदैवाने यावेळी कुलकर्णी यांचा तोल गेला नाही व त्यांना जबर दुखापत झाली नाही. मात्र या घटनेनंतर त्या प्रचंड घाबरल्या. इंदिरानगर परिसरात सोनसाखळी लांबविण्याच्या घटना नागरिकांच्या दारापुढे घडत असल्यामुळे संताप व्यक्त होत आहे. इंदिरानगर परिसर ज्येष्ठ नागरिकांची वसाहत म्हणून ओळखला जातो. या भागात सेवानिवृत्त कर्मचारी मोठ्या संख्येने वास्तव्यास आहेत. सकाळ-संध्याकाळ परिसरातील रस्त्यांवर त्यांची वर्दळ असते. याचवेळी चोरट्यांकडून त्यांना लक्ष्य केले जात आहे.

टॅग्स :theftचोरीPoliceपोलिस