पंचवटीत अघोरी विद्येचा प्रकार ?
By Admin | Updated: August 25, 2016 00:40 IST2016-08-25T00:37:28+5:302016-08-25T00:40:24+5:30
लाटे वाड्यातील प्रकार : संशयास्पद जागा मालकाची चौकशी

पंचवटीत अघोरी विद्येचा प्रकार ?
पंचवटी : पाथरवट लेन परिसरातील लाटे वाड्यात असलेल्या एका पत्र्याच्या बंद खोलीत दोन बाय पाच आकाराचे खड्डे खोदलेले व त्याभोवती लिंबू, मिरच्या, काळे कापड, खिळे अशा वस्तू मिळाल्याने अघोरी विद्या सुरू असल्याचा संशयास्पद प्रकार उघडकीस आला आहे. भरवस्तीत घडलेल्या या प्रकाराने नागरिकांत खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी संबंधित जागा मालक विजय लाटे याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. लाटे यांच्या जागेत अघोरी विद्या सुरू असल्याचा संशय आल्याने दत्ता लाटे नामक युवकाने पोलिसांत माहिती कळविल्यानंतर पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पूजेचे साहित्य जप्त केले आहे. पोलिसांनी लाटे यांची चौकशी केल्यानंतर सदर खड्डा घराचे बांधकाम करायचे असल्याने पाण्याची टाकी करण्यासाठी खोदल्याचे सांगितले.