शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

दोन युवा शेतकऱ्यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 18:13 IST

नाशिक जिल्'ातील घटना : सुदैवाने एक जण बचावला

ठळक मुद्देअतिशय गरीब परिस्थितीत कष्ट करून संदीप आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता

नाशिक : देवळा तालुक्यातील मेशी येथील दोन युवा शेतकऱ्यांचा विजेचा शॉक लागून जागीच मृत्यू झाल्याची दुदैवी घटना शनिवारी (दि. ८) सकाळी घडली आहे. या दोघा युवकांच्या मदतीसाठी गेलेला तिसरा युवक सुदैवाने बचावला आहे. दरम्यान, मृत दोघा युवकांवर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.याबाबत सविस्तर वृत्त असे की, शुक्रवारी (दि.७) सकाळी ११ वाजेच्या सुमारास विहिरीतील विजेचा पंप सुरू करण्यासाठी तरु ण शेतकरी संदीप नानाजी शिरसाठ (३१) गेला असता मोटारच्या लोखंडी पेटीला विजेचे करंट उतरलेले असल्याने संदीप लोखंडी पेटीला लटकला. तो मदतीसाठी आरडाओरडा करत असल्याचे बघून थोड्याच अंतरावर मका पिकाला पाणी देत असलेला भूषण उर्फमनोज रमेश शिरसाठ (२३)हा त्याच्या मदतीला धावून गेला असता तोही पेटीला लटकला. दोघांची मदतीसाठी धडपड पाहून जवळच असलेला कृष्णा उत्तम शिरसाठ हा देखील त्यांच्या मदतीला गेला असता तो सुद्धा त्यांना लटकला पण सुदैवाने तो शॉक लागताच बाजूला फेकला गेला .त्यामुळे तो बचावला.या घडलेल्या प्रकारात संदीप शिरसाठ व भूषण शिरसाठ यांना गावातील व आजूबाजूच्या लोकांनी तात्काळ रु ग्णवाहिका बोलवून देवळा ग्रामीण रु ग्णालयात दाखल केले . मात्र, संदीप आणि भूषण यांचे प्राण वाचविण्यात अपयश आले. रु ग्णालयातील डॉक्टरांनी संदीप आणि भूषण यांना मृत घोषित केले तर जखमी झालेल्या कृष्णा शिरसाठ यांना मालेगाव येथील खाजगी दवाखान्यात दाखल केले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. याबाबत देवळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद दाखल झाली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मातोंडकर, वाघमारे, पोलीस हवालदार धोक्र ट, गायकवाड हे करीत आहेत.गावावर शोककळासंदीप शिरसाठ यांचा गेल्या आठ वर्षांपूर्वी विवाह झाला होता. अतिशय गरीब परिस्थितीत कष्ट करून संदीप आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. संदीप शिरसाठ यांच्या पश्चात पत्नी,आई-वडील,भाऊ आणि भावजयी असा परिवार आहे तर भूषण शिरसाठ हा आपल्या आई वडिलांचा एकुलता एक होता. देवळा महाविद्यालयात शिक्षण घेत होता. 'ा दुर्घटनेमुळे मेशी गावावर शोककळा पसरली आहे. सायंकाळी मेशी येथील स्मशानभूमीत दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

 

टॅग्स :NashikनाशिकAccidentअपघात