शहरात दोन महिलांचे मंगळसूत्र खेचले

By Admin | Updated: December 12, 2015 23:24 IST2015-12-12T23:21:17+5:302015-12-12T23:24:09+5:30

शहरात दोन महिलांचे मंगळसूत्र खेचले

Two women's mangalasutra pulls in the city | शहरात दोन महिलांचे मंगळसूत्र खेचले

शहरात दोन महिलांचे मंगळसूत्र खेचले

नाशिक : शहरात सोनसाखळी व मंगळसूत्र चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असून, शनिवारी (दि़१२) दोन महिलांचे मंगळसूत्र दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी खेचून नेल्याची घटना घडली आहे़ या प्रकरणी इंदिरानगर व सरकारवाडा पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
इंदिरानगर परिसरातील एलआयसी कॉलनीतील रहिवासी अंजली तांबोळी या सकाळी नऊ वाजेच्या सुमारास पायी जात होत्या़ त्यावेळी दुचाकीवर आलेल्या दोघा संशयितांनी पत्ता विचारण्याच्या बहाणा त्यांच्या गळ्यातील ३० हजार रुपये किमतीचे २५ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र खेचून नेले़ या प्रकरणी तांबोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून इंदिरानगर पोलीस ठाण्यात जबरी चोरीची गुन्हा नोंदविण्यात आला आहे़
दुसरी घटना राका कॉलनी परिसरात घडली आहे़ मूळच्या घाटकोपर येथील रहिवासी दिव्याबेन चंदुलाल संघवी या जैन मंदिरातून दर्शन घेऊन परतत होत्या़ त्यावेळी पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या दोघा संशयितांनी त्यांच्या गळ्यातील साठ हजार रु पये किमतीची सोन्याची पोत खेचून नेली़ याप्रकरणी संघवी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Two women's mangalasutra pulls in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.