देवसाने येथे वीज पडून दोन विद्यार्थिनी जखमी

By Admin | Updated: March 2, 2016 23:37 IST2016-03-02T23:34:47+5:302016-03-02T23:37:59+5:30

देवसाने येथे वीज पडून दोन विद्यार्थिनी जखमी

Two women were injured in the accident in Devasah | देवसाने येथे वीज पडून दोन विद्यार्थिनी जखमी

देवसाने येथे वीज पडून दोन विद्यार्थिनी जखमी


४वणी : दिंडोरी तालुक्यातील देवसाने परिसरात दोन विद्यार्थिनींच्या अंगावर बुधवारी दुपारच्या सुमारास वीज पडल्याने दोघी जखमी झाल्या आहेत. त्यांना उपचारासाठी जिल्हा रु ग्णालयात हलविण्यात आले आहेत. देवसाने येथील शाळेत चौथीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या पार्वता विनायक धुळे (१०) आणि वृषाली गिरीधर कडाळे (११) या दोघी शाळा सुटल्यानंतर देवसाने मोरवण रस्त्यावरून घरी जात असताना त्यांचे अंगावर पावणे सहा वाजेच्या सुमारास वीज कोसळली. परिसरातील ग्रामस्थ व कुटुंबियानी दोघीना रु ग्णालयात दाखल केले. मात्र अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना जिल्हा रु ग्णालयात हलविण्यात आले.

Web Title: Two women were injured in the accident in Devasah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.