नाशिक पेठ रस्त्यावर अपघातात दोन महिला ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2015 22:48 IST2015-10-18T22:46:43+5:302015-10-18T22:48:34+5:30
दिंडोरी : दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात स्कार्पिओ दरीत कोसळली

नाशिक पेठ रस्त्यावर अपघातात दोन महिला ठार
दिंडोरी : नाशिक-पेठ-धरमपूर रस्त्यावर रासेगाव शिवारातील एका अपघातप्रवण जागेजवळ दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात स्कॉर्पिओला झालेल्या अपघातात दोन महिला ठार झाल्या असून वाहनचालकासह तीन महिला भाविक गंभीर जखमी झाल्या आहेत. जखमींवर जिल्हा रु ग्णालयात उपचार सुरु आहे.
दुर्घटनाग्रस्त झाल्याल्या स्कॉर्पिओमधून काही भाविक गुजरातमधील चिन धर्म स्थळास भेट देवून परतत होते. नाशिक-पेठ-धरमपूर रस्त्यावर रविवारी दुपारी एका दुचाकीला वाचिवण्याच्या नादात गुजरातमधील चिन धर्म स्थळास भेट देवून नाशिकला परतणाऱ्या भाविकांच्या स्कोर्पिओ गाडीला अपघात होत झाला. या वेळी गाडी पलटी झाल्याने या अपघातात दोन महिला जागीच ठार झाल्या. तर पाच जण जखमी झाले आहे . सातपूर येथील एम एच १५ इ एक्स ५५१५ स्कॉर्पिओ गुजरातहून नाशिककडे भरघाव वेगात येत असताना पेठ रस्त्यावर रासेगाव शिवारात ही घटना घडली. समोरून येणाऱ्या एका दुचाकीस्वाराला वाचिवण्याच्या नादात चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने स्कॉर्पिओ सुमारे चारशे फुट खोल कोसळल्याने गाडीचा चक्काचूर झाला. या अपघातात नाशिकच्या इंदिरानगर येथील रहिवासी चंदाबाई ओमकार थोरात (४६) व त्रिमूर्ती चौक येथील अनिता संजय पाडवी (४०) या दोन महिला जागीच ठार झाल्या . तर सातपूरचा रहिवासी पप्पू पशुपतीनाथ पांडे (३५) पाथर्डी येथील अनुराधा राजू साळुंखे (४२), आशा प्रकाश अहिरे (३५) रा. सातपूर, ख्रिस्तिना प्रमोद भोसले रा. इंदिरानगर या गंभीर जखमी झाल्या. अपघाताची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक एस. जे .शेख हवालदार कदम, खांडवी यांनी घटनास्थळी धाव घेत ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना गाडी बाहेर काढत नाशिक येथे उपचारासाठी पाठवले असून अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे. (वार्ताहर)
रस्त्याचे रु ंदीकरण, नुतनीकरण करण्याची मागणी
या अपघातस्थळी यापूर्वीही अनेक अपघात झाले असून येथे गतिरोधक बसवावे तसेच या रस्त्याचे रु ंदीकरण व नुतनीकरण करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे .रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने चालकाकडून खड्डे चुकविण्याच्या नादात सातत्याने अपघातात वाढ होत असून राष्ट्रीय महामार्ग घोषित होवूनही रस्त्याची दुर्दशा थांबलेली नाही. सिहंस्थाच्या दुसऱ्या पर्वणीच्या दिवशी एका दुचाकीला वाचिवण्याच्या नादात संट्रो, आयशर व दुचाकीत अपघात झाल्याने तीन भाविक ठार झाले होते.