देवळाली गावात दुचाकी पेटविल्या

By Admin | Updated: January 10, 2015 00:47 IST2015-01-10T00:47:27+5:302015-01-10T00:47:37+5:30

देवळाली गावात दुचाकी पेटविल्या

Two wheelers were lit in Deolali village | देवळाली गावात दुचाकी पेटविल्या

देवळाली गावात दुचाकी पेटविल्या

नाशिकरोड : देवळालीगाव धनगर गल्ली येथे घरापुढे उभ्या केलेल्या दोन दुचाकी समाजकंटकाने ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून दिल्याने एक दुचाकी जळून खाक झाली, तर दुसऱ्या दुचाकीचे किरकोळ नुकसान झाले आहे.
देवळालीगाव धनगर गल्लीत राहणारे विशाल नारायण सांबरक्षत्रिय व त्यांचे कुटुंबीय राहतात. नेहमीप्रमाणे त्यांनी घरापुढे स्प्लेंडर प्लस (एमएच १५ सीयु १९१४) व कावासाकी बजाज (एमएच १५ व्ही २०३४) या दोन्ही गाड्या उभ्या केल्या होत्या. आज पहाटे तीन वाजेच्या सुमारास समाजकंटकांनी सांबरक्षत्रिय यांच्या घराला बाहेरून कडी लावून काहीतरी ज्वलनशील पदार्थ दोन्ही दुचाकीवर टाकून पेटवून दिले. धूर व वासामुळे आजूबाजूचे नागरिक जागे झाले त्यांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. मात्र सांबरक्षत्रिय यांच्या घराला बाहेरून कडी लावल्याने ते बाहेर येऊ शकले नाही. आजूबाजूचे नागरिक आले व त्यांनी दरवाज्याला बाहेरून लावलेली कडी उघडली. तोपर्यंत स्प्लेंडर प्लस गाडी जळून खाक झाली होती. तर कावासाकी बजाज दुचाकीची आग विझविल्याने तिचे जास्त नुकसान झाले नाही. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.
काही महिन्यांपासून पोलीस प्रशासनाची कायदा-सुव्यवस्थेवरील पकड ढिली होत चाललेली असून, जनतेशी झालेला दुरावा, कोम्बिंग आॅपरेशन बंद झाल्याने पुन्हा गुन्हेगारांनी डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे १५-१६ तास उलटूनही याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता. घटना कशी घडली याविषयी नागरिकांमध्ये तर्कवितर्क लढविले जात आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Two wheelers were lit in Deolali village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.