येवला : शहर व परिसरात मोटारसायकल व ट्रॅक्टर चोरीचे सत्र सुरू असून, रविवारी पहाटेच्या सुमारास बदापूर रोडजवळ साईबाबा कॉलनीमधील ज्ञानेश्वर लक्ष्मण मगर यांची पॅशन-प्रो (क्र. एमएच १५ डीबी ०६७०) मोटरसायकल चोरीला गेली. तर याच परिसरात मारुती अण्णांचा ट्रॅक्टर खरेदी-विक्री व्यापार्याचे दोन रविवारी रात्री चोरी गेले आहेत. साखळीने कुलूप लावलेले असताना, साखळी तोडून सराईतपणे करवतीचा वापर करून ट्रॅक्टर हातोहात लांबविले.मागील महिन्यात शहराच्या मध्यवस्तीतून मयूर गुजराथी व नगराध्यक्ष नीलेश पटेल यांच्या मोटरसायकली चोरीला गेल्या होत्या. नागरिकांनी आपल्या वाहनांची काळजी घेतली पाहिजे, असे पोलीस सांगतात तर चोर्या होऊ नये म्हणून पोलिसांनी दक्ष राहिले पाहिजे, असे नागरिक म्हणतात. पोलिसांच्या मागचा निवडणुकीचा ताण संपताच आता वाहने चोरीचे रॅकेट शोधण्याचे मोठे आव्हान शहर पोलिसांसमोर आहे. (वार्ताहर)---
दुचाकी, ट्रॅक्टर चोरीची धास्ती येवल्यात वाहन चोर्यांचे सत्र सुरूच
By admin | Updated: May 5, 2014 19:14 IST