वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

By Admin | Updated: March 22, 2015 23:55 IST2015-03-22T23:55:18+5:302015-03-22T23:55:27+5:30

वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

Two wheelers killed in the vehicle | वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

नाशिक : पाठीमागून आलेल्या वाहनाने दिलेल्या धडकेत महादेवपूर येथील दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि़२२) सकाळी नांदूरनाका चौफुलीवर घडली़
याबाबत अधिक माहिती अशी की, गंगापूरजवळील महादेवपूर येथील रहिवासी शांताराम शंकर उजे (४२) हे सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास नांदूर नाक्यावरून नाशिकरोडकडे जात होते़ नांदूर चौफलीजवळ त्यांच्या दुचाकीला पाठीमागून आलेल्या वाहनाने (एमएच ०६, टी-२५८६) धडक दिली़ त्यामध्ये दुचाकीवरून फेकले गेल्याने उजे यांच्या डोक्यास व हातापायास जबर मार लागल्याने त्यांचे मेहुणे यशवंत फसाळे यांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले़ मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉ़ भोये यांनी तपासून मयत घोषित केले़ आडगाव पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

Web Title: Two wheelers killed in the vehicle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.