कारच्या धडकेने दुचाकीस्वार जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2015 00:07 IST2015-11-16T00:07:01+5:302015-11-16T00:07:46+5:30
कारच्या धडकेने दुचाकीस्वार जागीच ठार

कारच्या धडकेने दुचाकीस्वार जागीच ठार
वडाळीभोई : चांदवड तालुक्यातील वडाळीभोई सबस्टेशनसमोर हुंदाई कारने धडक दिल्याने मोटारसायकलस्वार जागीच ठार झाला. रविवारी (दि. १५) दुपारी १ वाजेच्या सुमारास शिरसाणे येथील शेतकरी दोन दिवसांपासून वीजपुरवठा खंडित असल्याने त्याच्या तपासासाठी वडाळीभोई सबस्टेशनमध्ये आले होते.
तेथून परतत असताना चांदवडकडून मुंबईकडे जाणाऱ्या हुंदाई कारने (क्र. एमएच १८ टी-१४४) डिस्कव्हर मोटारसायकलला (क्र. एमएच १५ डीबी-४४७४) धडक दिल्याने मोटारसायकलस्वार राजेंद्र गंगाधर जाधव (३३), रा. शिरसाणे, ता. चांदवड हे जागीच ठार झाले, तर या अपघातात हुंडाई कारचा चालकही गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर वडाळीभोई प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी नाशिकला रवाना केले.
अपघाताची माहिती मिळताच शिवसेनेचे तालुकाप्रमुख नितीन अहेर व त्यांच्या सहकाऱ्यांनी मृतास व जखमीस त्वरित रुग्णालयात दाखल केले. वडाळीभोई पोलीस स्टेशनला अपघाताचा गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.