नाशिक-पुणे महामार्गावर बसच्या धडकेने दुचाकीस्वार ठार
By Admin | Updated: October 13, 2016 01:05 IST2016-10-13T00:25:18+5:302016-10-13T01:05:59+5:30
नाशिक-पुणे महामार्गावर बसच्या धडकेने दुचाकीस्वार ठार

नाशिक-पुणे महामार्गावर बसच्या धडकेने दुचाकीस्वार ठार
सिन्नर : नाशिक - पुणे महामार्गावर राज्य परिवहन महामंडळाच्या बसने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने दुचाकीवर मागे बसलेला एकजण ठार झाला. मंगळवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास जिंदाल फाट्यावर सदर अपघात झाला.
सिद्धेशकुमार प्रतापनारायण सिंग (४५) व अन्य एकजण पॅशन प्रो मोटारसायकलहून सिन्नरकडून नाशिककडे जात असताना
मागून येणाऱ्या कळवण आगाराच्या बसने दुचाकीला धडक
दिली.
या अपघातात सिद्धेशकुमार सिंग ठार झाला, तर अन्य एकजण
जखमी झाला. याप्रकरणी बसचालका-विरोधात गुन्हा दाखल कररण्यात आला आहे.
(वार्ताहर)