नाशिक : भरधाव वेगाने वाहन चालविण्याचे प्रकार शहर व परिसरात वाढले असून, मोटारचालकांकडून रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत बेफामपणे वाहने दामटविले जात असल्याने दुचाकीचालकांना प्राण गमवावे लागत आहे. त्र्यंबकरोडवरील वासाळी फाट्यावर एका दुचाकीला अज्ञात मोटारीने जोरदार धडक दिली. या धडकेत वासाळी गावातील दोघे दुचाकीस्वार ठार झाले.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शुक्रवारी (दि.२८) सायंकाळी पावणेआठ वाजेच्या सुमारास एका पांढऱ्या रंगाच्या भरधाव मोटार त्र्यंबकेश्वरकडून नाशिककडे जात असताना वासाळी फाट्यावर मोटारचालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत दुचाकीला (एम.एच.१५ बीक्यू ६७१५) जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीचालक मोतीराम दत्तू लहांगे (५८,रा.वासाळी), त्यांच्या पाठीमागे बसलेला युवक संतोष पुंडलिक भालेराव (३२) हे रस्त्यावर कोसळले. दुचाकीस्वारांच्या डोक्याला तसेच हातापायांना गंभीर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला.
कारच्या धडकेत दुचाकीवरील दोघे ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 01:10 IST