विंचूरला अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
By Admin | Updated: January 3, 2016 00:13 IST2016-01-03T00:10:39+5:302016-01-03T00:13:47+5:30
विंचूरला अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

विंचूरला अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
विंचूर : येथील औरंगाबाद-नाशिक राज्यमार्गावरील निसर्ग लॉन्ससमोर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला. शनिवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास वाल्मीक सुकदेव सोनवणे (५५), रा. धारणगाव वीर, ता. निफाड हे बजाज चॅम्पियन (क्र . एमएच १५ एएन २९४०) या दुचाकीने विंचूरकडून निफाडकडे जात असताना अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीस धडक दिली. त्यात सोनवणे जागीच ठार झाले. सोनवणे हे धारणगाव वीर विविध का. सहकारी सोसायटीत कर्मचारी म्हणून कार्यरत होते. याबाबत लासलगाव पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक आर.बी. सानप यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक आर. टी. तांदळकर, पोलीस हवालदार धोक्र ट आदि करीत आहे. (वार्ताहर)