अपघातात दुचाकीचालक ठार
By Admin | Updated: December 5, 2015 23:27 IST2015-12-05T23:26:59+5:302015-12-05T23:27:59+5:30
अपघातात दुचाकीचालक ठार

अपघातात दुचाकीचालक ठार
नाशिक : दुचाकीचे टायर फुटल्याने झालेल्या अपघातात जखमी झालेल्या सुरगाणा तालुक्यातील साकूर येथील युवकाचा उपचारादरम्यान शुक्रवारी मृत्यू झाला़ मयत युवकाचे नाव विशाल खंडू कातोरे (२६) असे आहे़ बुधवारी (दि़२) सायंकाळी साकूरहून ओतूरकडे जात असताना विशालच्या दुचाकीचे टायर फुटल्याने अपघात झाला़ त्यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्यास उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ मात्र प्रकृती बिघडल्याने त्यास शुक्रवारी (दि़४) जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले़ दरम्यान, या अपघाताची पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)