नशिक : गंगापूर-त्र्यंबक लिंकरोड परिसरातील ध्रुवनगर येथील अजिंक्य हाइट््स येथील इमारतीच्या पार्किंगमध्ये उभ्या केलेल्या मोेटारसायकलची जाळपोळ करण्यात आल्याची घटना गुरुवारी (दि.१९) रात्री आठच्या सुमारास घडली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी इमारतीत राहणारे गणेश बाळासाहेब शिंदे यांनी संशयित सुरज आंबोरे यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संशयित आरोपीने फिर्यादी गणेश शिंदे यांच्यासह अन्य साक्षीदारांच्या इमारतीच्या पार्किंमध्ये उभी केलेली वाहन जाळून रहिवाशांच्या जीवितास धोका निर्माण होईल, असे कृत्य करीत मोटारसायकल व बिल्डिंगचे नुकसान केले म्हणून गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गंगापूरमध्ये दुचाकींची जाळपोळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 01:08 IST