पिकअपच्या धडकेने दुचाकीस्वार जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:10 IST2021-06-30T04:10:05+5:302021-06-30T04:10:05+5:30

लोहोणेर : - लोहोणेर - भऊर रस्त्यावर शिव नाल्याच्या जवळ पिकअप व दुचाकी यांच्यात मंगळवारी सकाळी १० वाजेच्या ...

The two-wheeler was injured in the collision of the pickup | पिकअपच्या धडकेने दुचाकीस्वार जखमी

पिकअपच्या धडकेने दुचाकीस्वार जखमी

लोहोणेर : - लोहोणेर - भऊर रस्त्यावर शिव नाल्याच्या जवळ पिकअप व दुचाकी यांच्यात मंगळवारी सकाळी १० वाजेच्या दरम्यान झालेल्या अपघातात दुचाकीस्वार योगेश मुरलीधर निफाडे (२८ ) रा. शिरवाडे वणी जखमी झाला. त्याच्यावर तातडीने कळवण येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. याबाबत भऊर येथील पोलीस पाटील भरत पवार यांनी देवळा पोलीस ठाण्यात माहिती दिली. शिरवाडे वणी येथील युवक योगेश मुरलीधर निफाडे (२८ ) हा कळवणहून आपल्या हिरो होंडा स्प्लेंडर प्रो या दुचाकीने ( एम.एच.१५ एफ.इ.९५३१) लोहोणेरकडे जात असताना दहा वाजेच्या दरम्यान भऊर नेपाळी चौफुली पास करून पुढे भरधाव वेगाने जात असताना समोरून येणाऱ्या पिकअपने (एम. एच.४१ ए. यु. ०४५१ )दुचाकीस्वाराचा वेग नियंत्रणात न आल्याने जोरदार धडक दिली. दुचाकीस्वार योगेश निफाडे याच्या दोन्हीही पायाला, हाताला व डोक्याला जबर मार लागल्याने गंभीर जखमी झाला. त्यास तातडीने कळवण येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आले. पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करण्यात येत आहे. याबाबत भऊर येेथील बापू पवार, दिलीप पवार, चंद्रकांत पवार, रामदास पवार, भाऊराव पवार, दीपक पवार आदींनी अपघातग्रस्त युवकास रुग्णालयात हलविण्यासाठी प्रयत्न केले. (२९ लोहोणेर ॲक्सिडेंट)

===Photopath===

290621\29nsk_3_29062021_13.jpg

===Caption===

२९ लोहोणेर ॲक्सीडेंट

Web Title: The two-wheeler was injured in the collision of the pickup